Home पश्चिम महाराष्ट्र ताराराणी प्राधान्य कार्ड धारकांना रांगेत उभे न करता प्रथम प्राधान्य देण्याचा बोर्ड...

ताराराणी प्राधान्य कार्ड धारकांना रांगेत उभे न करता प्रथम प्राधान्य देण्याचा बोर्ड लावण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना

220

राजेंद्र पाटील राऊत

ताराराणी प्राधान्य कार्ड धारकांना रांगेत उभे न करता
प्रथम प्राधान्य देण्याचा बोर्ड लावण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना

 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात
बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेंतर्गत बँकेत/ कार्यालयात येणाऱ्या एक किंवा दोन मुलींवर कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या ताराराणी प्राधान्य कार्ड धारक ग्राहकांना कोणत्याही रांगेत उभे न करता प्रथम प्राधान्य देवून सेवा दिली जाईल, याची नोंद घ्यावी, असा बोर्ड आपल्या कार्यालयात व बँकेत लावण्याच्या सूचना कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या आहेत .
बेटी बचाओ बेटी पढाओ या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढविण्यासाठी व सन्मान देण्यासाठी ही नाविन्यपूर्ण योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत मागील पाच वर्षातील एक व दोन मुलींनंतर कुटूंब शस्त्रक्रिया केलेल्या पालकांना व मुलींना सन्मानीत करण्यासाठी प्राधान्य कार्ड देण्यात आले असून त्यांना कोणत्याही रांगेमध्ये न थांबवता त्यांना प्रथम प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.

कोल्हापूर , युवा मराठा न्यूज नेटवर्क

Previous articleराहुरी फॅक्टरी (कराळे वाडी) येथील रस्त्यातील अडथळे दूर करावेत
Next articleविजबिलाच्या वसुली विरोधात राज्यभर आरपार ची लढाई, प्रा.डाँ.एन.डी.पाटील
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.