Home Breaking News 🛑 पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ 🛑

🛑 पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ 🛑

105
0

🛑 पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे:⭕वाघजाई माता व्यापारी संघटना नावाने सुरू केलेली संघटना ,फक्त वर्गनीचा होणारा त्रास एकत्र गोळा करून स्थानिक मंडळ यांना दणे ,हळू हळू दादागिरी दमदाटी फुकट खाणे उधारी याचा त्रास कमी करण्यासाठी संघटनेने कार्य केले,

नंतर सिंहगड रोड व्यापारी असो अंतर्गत सामाजिक कार्याला सुरुवात केली,वारकरी अन्न धान्य वस्तू वाटप कार्यक्रम, शालेय विद्यार्थी संघा च्या वतीने शालेय वस्तू वाटप कार्यक्रम, दहीहंडी मंडळ तसेच गणेश उत्सव नवरात्री उत्सवा निमित्त कार्यक्रम, जेष्ठ नागरिक मेळावा, नवनिर्वाचित बाल गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मुलांन साठी संवाद परिवर्तनाचा कार्यक्रम घेऊन व्यवसायाचे मार्गदर्शन, महीला संघटने अंतर्गत महीला सबलीकरण, विविध शासकीय अधिकारी यांच्या सोबत काटा वेध मापन विभाग, अन्न धान्य प्रशासन विभाग,शाॅपअॅक्ट विभाग, पोलीस प्रशासन यांचे व्यापारी वर्गाला मार्गदर्शन मेळावे, घेणे, नवनवीन स्थानिक कंपन्यांना प्राधान्य देवून स्वदेशी वीषयी जनजागृती,आपल्या देशातील युग पुरुष व माता यांची जयंती साजरी करणे, मल्टी नॅशनल कंपनी विरोधात ऑनलाईन बद्दल मार्गदर्शन, असे वर्ष कार्यक्रम संघटने अंतर्गत चालू केले,

2014 LBT चे मोठे आंदोलनात महत्त्वाची भुमीका रिटेल व्यापारी संघाच्या वतीने घेतली, या आंदोलनात सहभागी होऊन मोलाची साथ दिली,

होलसेल विक्री करणारे मार्केट यार्ड येथील किरकोळ विक्री बंद व्हावी म्हणून आंदोलन केले,काही अनुभवी व्यक्तींच्या सहकार्याने ते आंदोलन यशस्वी झाले, तरी सुद्धा म्हणावे तशे किरकोळ व्यापारी एकत्र न्हवते.

सन 2015 मधील ऑक्टोबरचा महिना… किरकोळ दूध विक्रेत्यांना(दुकान दार, दुध विक्रेते) अनेक वर्षांपासून कमिशनमध्ये वाढ न मिळाल्याच्या मुद्द्यांवरुन हातावर मोजण्या इतक्या किरकोळ विक्रेत्यांनी पुणे जिल्हा दुध वितरक संघटनेच्या माध्यमातून आंदोलन केलं व सर्वांचे कमिशन वाढवून घेतले…

कुठलंही संघटन नाही की, मोठं पाठबळ नाही…

केवळ मुद्द्यांवर व न्याय हक्कांवर झालेलं हे आंदोलन यशस्वी झालं.

सिंहगड रोड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सचिन निवंगुणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी किरकोळ दूध विक्रेत्यांना न्याय मिळवून दिला…

आणि याच आंदोलनादरम्यान शहरातील किरकोळ विक्रेते, छोटे दुकानदार व व्यापाऱ्यांचे अनेक प्रश्न असून त्यासाठी काम करणारी संघटना नसल्याचं वास्तव समोर आलं…

याच जाणीवेतून पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली गेली…

अन् जानेवारी 2016 मध्ये पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ ही संघटना अस्तित्वात आली…

किरकोळ व्यापारी व दुकानदार… हे सामान्यत: कमी शिकलेले व कमीअधिक तर अशिक्षितच आढळतात… अशा या रिटेल व्यापाऱ्यांसमोर रिटेल ऑनलाइन मार्केट व मॉलचं तगडं आव्हान उभं राहिलंय… इतरही अनेक प्रश्न आहेत.

या प्रश्नांसाठी लढा देण्याबरोबरच…
विविध कर…
महापालिकांच्या परवानग्या…
पोलीस व इतर सर्व प्रकारच्या कायदेशीर बाबींविषयी मार्गदर्शन करणे…
त्यासाठी विविध कार्यशाळांचे आयोजन करणे…
प्लास्टिक गोळा करुन त्यापासून वस्तु बनविणे…
व पर्यावरणाच्या रक्षणार्थ व्यापाऱ्यांमध्ये जनजागृती करणे…
पारदर्शक व्यापारासाठी आग्रही राहून त्यासाठी व्यापाऱ्यांचे प्रबोधन करणे…
यासारखे अनेक चांगले उपक्रम संघटनेच्या वतीनं सुरुवातीपासूनच राबविले जात आहेत.

किरकोळ दूध विक्रेत्यांना कमिशन वाढ मिळवून देण्याबरोबरच प्लास्टिक बंदीविरोधातील आंदोलन असो अथवा व्यापाऱ्यांवरील अन्यायाच्या विरोधातील लढा… पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ कायमच व्यापाऱ्यांच्या हितासाठी कटीबद्ध राहिलाय.

रिटेल व्यापाऱ्यांसमोरील आव्हानांचा सामना करीत असतानाच रिटेल व्यवसायाच्या जागतिक स्पर्धेला इथला रिटेल व्यापारी सक्षम करण्यासाठी आवश्यक ते सर्व करण्याचा मनोदय पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचा आहे. याबरोबरच व्यापाऱ्यांची व मालमत्तेच्या सुरक्षिततेबरोबरच आपलं शहर व जिल्ह्यातील गुन्हेमुक्त करण्यासाठी पोलिसांच्या सहकार्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा उपक्रम संघटनेच्या स्तरावर हाती घेण्यात आला असून त्यासाठी व्यापाऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.

*यासाठी संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य कटीबद्ध आहेत…*

चायना आपल्या देशावर कायम काहीतरी कुरघोडी करत आसतो, संघटनेच्या वतीने चायना विरोधात उपक्रम राबविण्यात येतो, तसेच स्थानिक कंपन्यांना तसेच भारतीय वस्तूंना प्राधान्य देऊन स्वदेशीचा नारा संघटनेच्या वतीने दिला आहे, या साठी आपल्यातीलच स्थानिक व्यापारी वर्गाला मदतीचा हात संघटनेने दिला आहे.

*आपण सर्व जन मिळुन दर वर्षी 25 मे व्यापारी दिन साजरा करत आहोत*, या कार्यक्रमा साठी हजारो व्यापारी उपस्थित राहतात.

संघटनेच्या अंतर्गत प्रत्येक विभागात
गाव तालूका शहरातील प्रत्येक भागातील सर्व प्रकारचे व्यवसायीक एकत्र येऊन संघटनेच्या शाखेची स्थापना स्थानिक व्यापारी वर्गाने करावी ,19 वर्षा पूर्वी दहा लोकांना घेऊन केलेली संघटनेची स्थापना, आज शंभरच्या वरती संघनेच्या शाखा झाल्या दोन ते आडीच लाखा पर्यंत व्यापारी वर्गाचे नेतृत्व आज संघटना करते, संघटनेचे वटवृक्षा मध्ये रुपांतर करण्यात आपल्या सारख्या सर्व छोट्या मोठ्या व्यापारी वर्गाचा हाथ आहे,हे करत असताना च संघटनेचे अध्यक्ष सचिनभाऊ निवंगुणे यांच्या प्रयत्नाने पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ राज्य व देश पातळीवर असनारी *काॅन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स-कैट* यांच्याशी जोडली गेली, म्हणून च आम्ही सर्वांना सांगतो ,
*उठ व्यापारी जागा हो, व्यापारी संघटनेचा धागा हो,*

जे कोनी संघटने अंतर्गत काम करण्यासाठी इछुक असेल त्यांनी संघटनेशी संपर्क साधावा, तसेच आपल्या कामाचा आढावा घेऊन आपणास योग्य तो पदभार दिला जाईल, पुणे जिल्हाच्या प्रत्येक तालूका शहरात तसेच गाव पातळीवर संघटनेचे पदाधिकारी नेमणे चालू झाले आहे,

*सचिनभाऊ निवंगुणे, अध्यक्ष*
*पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ*…..⭕

Previous article🛑 ” बेस्ट “कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड 🛑
Next article🛑 पिंपरीत थंडीची चाहूल 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here