*समाजकंठक सदावर्ते याचा वडगांव मधे पुतळा दहन करून जाहीर निषेध*
*कोल्हापूर मोहन शिंदे ब्युरो चिफ युवा मराठा न्युज)*
समाजकंटक सदावर्ते याने छत्रपती खा.संभाजीराजे राजे भोसले व छत्रपती खा. उदयनराजे भोसले यांचेबद्दल जे बेताल वक्तव्य केले त्या निषेधार्थ पेठ वडगांव शहरातील पालिका चौकात भगव्या झेंड्याखाली सदावर्तेच्या पुतळ्याला मराठा समाजातील युवकानी जोड्याने मारून लाथा घालुन पुतळा दहन करून सदावर्तेच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.
अफजलखानाची औलाद म्हणजे काय ? हे माहीत असुन सुध्दा बेताल वक्तव्य करून जाणीवपूर्वक समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने व जे आंदोलन जगामध्ये आदर्श ठरले ते कुठे तरी हिंसक बनावे आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडावे या उद्देशाने केले आहे. शासन व प्रशासन यांनी सदावर्ते याच्यावर समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, शांतता भंग होईल असे बेताल वक्तव्य करणे. यासंदर्भात सदावर्तेवर कडक कारवाई करावी. मराठा समाज आपल्या हक्कासाठी लढा देत आहे, तोही शांततेत याचा गैरफायदा घेणेचा प्रयत्न होउ नये कारण मराठा समाजमनातील खदखद बाहेर पडणेस वाट करुन देऊ नका ,असंतोष फार मोठा आहे. होणारा उद्रेक फार मोठा असेल. आमच्या अस्मितेला हात घालणेचा जो प्रयत्न होत आहे तो वेळीच थांबला पाहिजे. त्याचप्रमाणें प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा राजेच्या बद्दल वक्तव्य करून छ.शाहु महाराज यांचाच नाहीतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही अपमान केला आहे.
मराठा समाजाला पहीले यश ,
मराठा आरक्षणाला स्थगिती आल्याने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची (एम.पी.एस.सी.) राज्य सेवा पूर्व परीक्षा स्थगित करा अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्यावर निर्णय घेण्यास विलंब लागल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर राज्य सरकारला याची दखल घेऊन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागल्याने मराठा समाजाने त्याचे स्वागत केले आहे.
यावेळी अँड.प्रशांत शिंदे ,अँड.अक्षय शिंदे , नगरसेवक संदिप पाटील , रायसिंग भोसले , सचिन चव्हाण , सुहास जाधव , सचिन पाटील , विजयसिंह शिंदे , डाँ.अभयसिंह यादव , संदिप पाटील (लालु) राहुल पोवार , सनी पाटील , सुयोग पाटील , प्रविण खोपकर , मछिंद्र पाटील , विवेक पाटील , बाळासाहेब पाटील , आसमान मोहीते , हणमंत पाटील , किशोर पन्हाळकर , दिपक पाटील , किरण यादव , इत्यादी मराठा समाजाचे युवक उपस्थित होते.