Home Breaking News *मराठा समाजाच्या वतीने हातकणंगले तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण*

*मराठा समाजाच्या वतीने हातकणंगले तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण*

189
0

*मराठा समाजाच्या वतीने हातकणंगले तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवावी या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने हातकणंगले तालुक्याच्या ठिकाणी सकल मराठा समाज समन्वय समितीच्या वतीने तहसिल कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले .
राज्यात सर्वच ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्याने आक्रमक झाला आहे . त्यामुळे मराठा समाज ठिकठिकाणी उपोषण , आंदोलन करून राज्य व केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करताना दिसत आहे.
पण अजुनही सरकार झोपेचे सोंग घेत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला जाणीवपूर्वक सरकार दुर्लक्ष करत आहे. हा लढा आरक्षण मिळेपर्यंत असाच मोठ्या प्रमाणात चालुच राहणार असल्याचे उपोषणावेळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले .
यावेळी मराठा समाजाच्या वतीने सरकार विरोधात आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा
जोरदार घोषणा दिल्या.
या आंदोलनस्थळी आज हातकणंगले तालुक्याचे आमदार राजूबाबा आवळे यांनी भेट देवून मराठा बांधवांच्या आंदोलनाला व मागण्यांना पाठिंबा व्यक्त केला. समाजाच्या मागण्या योग्य असून लोकप्रतिनिधी म्हणून या मागण्यांना माझा पूर्ण पणे पाठिंबा देत असे सांगितले . मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी मी सदैव मराठाबांधवांसोबत पाठीशी राहणार आहे अशी हमी यावेळी आमदार राजूबाबा आवळे यांनी दिली.
यावेळी हातकणंगले तालुक्यातुन मराठा समाज बांधव मोठ्या संख्याने उपोषणाला आले होते.

Previous articleनांदेड शहर गोळीबारीने पुन्हा एकदा हदरले, जुना मोंढ्यात बंदुकीचा धाक दाखवून लूटमार, एक जखमी
Next article*सकल मराठा समाजाच्या वतीने* *इचलकरंजीत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here