नांदेड शहर गोळीबारीने पुन्हा एकदा हदरले, जुना मोंढ्यात बंदुकीचा धाक दाखवून लूटमार, एक जखमी
नांदेड,दि ५ : राजेश एन भांगे
नांदेड शहरात झालेल्या गोळीबाराने शहर पुन्हा एकदा हदरले आहे.
या गोळीबारात एक युवक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना शहरातील जुना मोंढा परिसरातील महाराज रणजीतसिह मार्केट येथे सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास घडली असुन.
मागच्या महिनाभराच्या काळात नांदेड शहर शांत होते, या काळात पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांची बदली सुद्धा झाली. त्या जागी प्रमोदकुमार शेवाळे हे रुजू झाल्याच्या पंधरा दिवसांतच ही घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
दि.४ रोजी रविवारी दोन मोटर सायकिल वरुण आलेल्या चार आरोपींनी त्या भागातील कॉर्नरवर असलेल्या टपरी चालक आकाश परिहार यांच्या पोटाच्या उजव्या बाजूस गोळी लागून ते जखमी झाले. व पुढील उपचारास हलविण्यात आले असल्याची माहिती आहे. सदरील आरोपींनी या भागातील विजय लक्षमी ट्रेडर या कापड दुकानातील गल्यातून दरोडेखोरांनी १० हजार रुपये हिसकावले. तसेच श्रीकृष्ण,मंगलमूर्ती व दिव्या ट्रेडर्स या दुकानावर गोळीबार करत व्यापाऱ्यात दहशत निर्माण करून आरोपी फरार झाले. मागच्या काही वर्षांमध्ये नांदेड शहरात गोळीबार, लूटमार, खंडणी व अपहराण असे प्रकार घडत आहेत. सदरील घटना घडताच पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे घटनास्थळी दाखल झाले व
गोळीबार प्रकरणातील आरपींचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.