*राहुरी फॅक्टरी येथे श्रीरामपूर नाक्यावर गती रोधक बसविण्याची मागणी* *अनेक निश्षाप जिवांचा जातोय बळी* अहमदनगर, (प्रतिनिधी, प्रा,ज्ञानेश्वर बनसोडे युवा मराठा न्युज नेटवर्क)- अहमदनगर -मनमाड हायवे वर मध्यवर्ती ठिकाणी राहुरी फॅक्टरी हे गाव आहे, रोड च्या पलीकडे व पलीकडेही मोठया प्रमाणात लोकसंख्या आहे, आणि त्यात चौफुली च्या पलीकडे एक नामांकित व नावाजलेले डी पॉल इंग्लिश मिडीयम हायस्कूल आहे ,त्या हायस्कूल मध्ये यु के जी पासून ते इयता १० वी पर्यंत हजारोंच्या संख्येने विद्यार्धी शिक्षण घेत असतात, व काही विदयार्थी ,मोटार सायकल ने तर काही रिक्षाने ,तर काही बसने तर काही विद्यार्थी पायी प्रवास करून ज्ञान ग्रहण करण्यासाठी सर्वांची शाळेत जाण्यासाठी सकाळी एकच धांदल उडत असते,व दुपारी साधारण सदर विद्यालय साधारणपणे 3,30 च्या दरम्यान सुटते ,त्या वेळी देखील या चिमुरड्यांच्या पोटात कावळे कोकलत असल्यामुळे पोटाची भूक भागविण्या करीता गाड्या घोड्यांची पर्वा न करता घराकडे धाव घेत असतात ,आणि नेमके या महामार्गावर गाड्या या अगदी तुफान वेगाने धावत असल्यामुळे व गतिरोधक नसल्याने अपघात घडण्याची दाट शक्यता असते, या पूर्वी देखील या चौफुलीवर अनेक जीवांचा बळी गेला आहे,सध्या लॉक डाऊन मूळे विद्यालये बंद आहेत, तो भाग वेगळा आहे, परंतु त्या ठिकाणी महाराष्ट्र् शासनाच्या संबंधित खात्याने या बाबीचा गांभीर्याने विचार करून त्वरित गतिरोधक बसवुन या निश्ष्पाप जीवांचा जाणारा बळी थांववा वा ,अशी मागणी विद्यार्धी व पालक वर्गातून करण्यात येत आहे
Home Breaking News *राहुरी फॅक्टरी येथे श्रीरामपूर नाक्यावर गती रोधक बसविण्याची मागणी* *अनेक निश्षाप जिवांचा...