*मराठा आरक्षणासाठी आणखी एक शहीद*
*कोल्हापूर ( मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*
बीड जिल्ह्यातील केतुरा गावचा विद्यार्थी विवेक कल्याण रहाडे हा बारावी पास विद्यार्थी गाव केतूरा ता.जिल्हा-बीड .विवेकने निटची परीक्षा दिली होती मराठा आरक्षणाला न मिळाल्यामुळे तो उदास होता आ.विनायक मेटे यांच्या फोनवर त्याने फोन करून सांगितले होते की, साहेब आरक्षण जर नाही मिळाले तर आत्महत्या करावी लागेल आज 30 सप्टेंबर 2020 रोजी त्याने गळफास ” घेऊन आत्मबलिदान दिले.
विवेकने स्वतः वहीत लिहून ठेवले होते कि….
मि विवेक कल्यान रहाडे एक कष्टकरी आणि गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला जीवनात खूप मोठं होण्याची इच्छा आहे मी आत्ता नीट ही मेडिकल ची परीक्षा दिली आहे. माझ्या नीट मध्ये मराठा आरक्षण गेल्यामुळे नंबर लागत नाही. माझ्या घरच्यांची मला प्रायव्हेट मध्ये शिकवण्याची ऐकत नाही त्यामुळे मी माझे आयुष्य संपत आहे मी मेल्यानंतर तरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना मराठ्यांच्या मुलांची क्यू येईल आणि माझे मरण सार्थक होईल विवेक …