Home Breaking News 🛑 मासे खाणाऱ्या खवय्यानो कसे ओळखाल….! ताजा आणि शिळया माशांमधला फरक 🛑

🛑 मासे खाणाऱ्या खवय्यानो कसे ओळखाल….! ताजा आणि शिळया माशांमधला फरक 🛑

93
0

🛑 मासे खाणाऱ्या खवय्यानो कसे ओळखाल….! ताजा आणि शिळया माशांमधला फरक 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

खवय्ये:⭕ कस ओळखाल शिळ्या आणि ताज्या माशांमधील फरक

ताजे मासे दिसायला ताज्या फुलांप्रमाणे तरतरीत व चकचकीत ओलसर दिसतात.

थोडेसेही मरगळलेले असले तर ते मासे घेऊ नका.

काही ताज्या माशांना किंचीत हिरमुस वास असला तरी घाण कुजकट वास येत नाही.वासावरुनन ताजेपणा ओळखा.ताज्या माश्याचे डोळे चकचकीत काळेभोर आणि पारदर्शक दिसतील. लालसर किंवा धुरकट पांढरे नसावे. काही मासे काप पाडून विकले जातात. ताज्या माशांचे तुकडे दिसायला व्यवस्थित असतात व त्यावर पारदर्शक पांढऱ्या रंगाची झाक असते.

मासा ताजा नसेल तर बोटाने थोडासा दाब दिल्यावर तिथे खोलगट ठसा उमटतो. ताज्या माश्यात असे होत नाही. ताज्या माशाचे कल्ले थोडेसे उघडून पाहिल्यास आतमधून बऱ्यापैकी लाल किंवा गुलाबी दिसतील. ते जर फिकट असले तर ताजेपणा संपलेला आहे.

खेकडे घेताना काळसर रंगाचे, जिवंत आणि चालणारे बघुन घ्यावेत. खेकडे घेताना खेकड्याची पाठ दाबुन पहावी. पाठ कडक असल्यास खेकडे आतुन मांसाने भरलेले असतात…..
जर खेकड्याची पाठ दबली गेली तर खेकडे आतुन पोकळ असतात , त्यातुन खायला काही मिळत नाही. अमावस्येला खेकडे मांसाने भरलेले असतात तर पौर्णिमेला खेकडे आतुन पोकळ असतात असे सांगितले जाते.

भिंगी, सुरमई, रावस, कारली, हलवा हे मासे विकत घेताना बोटांनी थोडे दाबुन घट्ट बघुन घ्यावेत. माशांचे तोंड उघडुन बघुन आतमध्ये लालसर भाग दिसला तर ते मासे ताजे आहेत असे समजावे. काळसर दिसले तर ते शिळे किंवा खराब आहेत असे समजावे.

रंगाने पांढरी आणि चमकदार दिसणारी पापलेट ताजी असतात. पापलेट घेताना त्यांच्या डोळ्याखालचा भाग दाबुन बघावा. त्यातुन सफेद पाणी आले तर ते ताजे असतात…..
लाल पाणी आल्यास ते शिळे असतात हे समजावे. तसेच पापलेट शिळी किंवा खराब होत आल्यास त्यांना पिवळसर रंग येऊ लागतो.

बोंबील हे ताजे बोंबील पांढऱ्या स्वच्छ रंगाचे, घट्ट व चमकदार असतात. त्यांच्या तोंडाच्या आतील भाग लाल असतो…..
बोंबील खराब व्हायला लागल्यास त्यांना पिवळसर रंग येतो.

शिंपले घेताना काळसर रंगाच्या व तोंड मिटलेल्या घ्याव्यात. जिवंत आणि तोंडाची उघडझाप करणाऱ्या शिंपल्याही घेऊ शकता…..
खराब आणि शिळ्या झालेल्या शिंपल्यांची तोंडे उघडी असतात आणि ती उघडत नाहीत.

करंदी तांबुस सफेद रंगाची आणि घट्ट सालीची करंदी ताजी असते.

तसेच काळसर सफेद रंगाचे चमकदार व घट्ट बांगडे ताजे असतात…
तोंड उघडून बघितल्यास लालसर रंगाचे दिसणारे बांगडे ताजे असतात. शिळ्या व खराब बांगड्यांना पिवळसर रंग येऊ लागतो आणि ते मऊ पडतात. बोटांनी दाबल्यास खड्डा पडतो….⭕

Previous article🛑 जास्त वेळ मास्क परिधान केल्यानं घशात खवखव होते…! जाणून घ्या उपाय 🛑
Next article🛑 राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची स्थिती…! भाजपच्या बड्या नेत्यांचा दावा 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here