Home Breaking News *मारुती मंदिर सार्वजनिक ट्रस्ट व ग्रा.पं. धामणेर यांच्या संयुक्त* *विद्यमानाने कोविंड सेंटरचा*...

*मारुती मंदिर सार्वजनिक ट्रस्ट व ग्रा.पं. धामणेर यांच्या संयुक्त* *विद्यमानाने कोविंड सेंटरचा* *लोकार्पण*

123
0

*मारुती मंदिर सार्वजनिक ट्रस्ट व ग्रा.पं. धामणेर यांच्या संयुक्त* *विद्यमानाने कोविंड सेंटरचा* *लोकार्पण*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

सातारा जिल्ह्यामध्ये सध्या कोरोना रुग्णांची वाढती संख्या व उपलब्ध मनुष्यबळात काम करताना प्रशासनाची कसरत होत आहे या पार्श्वभूमीवर धामणेर ता.कोरेगाव जि. सातारा येथे श्री.मारुती मंदिर सार्वजनिक ट्रस्ट व ग्रामपंचायत धामणेर यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या कोरोना कोविड 19 सेंटरचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते, जिल्हाधिकारी सातारा शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील माने यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
समाज हा कोणत्या ना कोणत्या कारणासाठी एकत्र यावा व समाजाचा, गावाचा विकास व्हावा या हेतूने कै.इंदुमती पां. पवार यांनी श्री.मारुती मंदिर सार्वजनिक ट्रस्टची स्थापना केली.व सध्या कार्यकारी अध्यक्ष मराठा बिझनेसमन फोरमचे अध्यक्ष अरुण पवार हे ट्रस्टचे अध्यक्ष आहेत.
यावेळी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक अविनाश माने, तहसीलदार सौ.शुभदा शिंदे, बी.डी.ओ.सौ.क्रांती बोराटे, ए. पी.आय.रहिमतपूर श्री.बल्लाळ, मेडिकल ऑफिसर डॉ.ए. एस.पाटील, आदर्श सरपंच शहाजीराव क्षिरसागर, आनंदराव कणसे, रिटा. कर्नल प्रकाश पवार, सरपंच सौ.संजीवनी सुतार, प्रदीप क्षिरसागर, सोमनाथ क्षिरसागर, सुरेश व्होवाळे, सचिन क्षिरसागर, हरिश्चंद्र कणसे, सौ.अंजली देशमुख, अशोक देसाई, अंकुश देसाई, शंकर पवार, सुनील क्षिरसागर व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here