*छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वतीने कोरोना वाँरियर्सना आँक्सिजन काँन्सट्रेटर चे २५ किट वाटप*
*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*
सातारचे छत्रपती ऊदयनराजे भोसले यांनी जिल्ह्यातील गरजूंना व कोरोना वाँरियर्स म्हणून काम करणाऱ्या योद्धांना अत्यंत उपयोगी वस्तूंचे वाटप केले .
आणि सातारा म्हंटलं की एकच नाव डोळ्यासमोर येते ते म्हणजे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले त्यांची स्टाइल असो वा त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिका त्यामुळे तेथे नेहमीच चर्चेत असतात.
खासदार छत्रपती उदयनराजे भोसले तळागाळातील लोकांना सोबत घेऊन काम करत आहेत.
त्यातच त्यांनी आज सातारा जिल्ह्यातील कोरोना ची गंभीर परिस्थिती पाहता जिल्ह्यातील गरजूंना व कोरोना वॉरीयर्स म्हणून काम करणाऱ्या संघटनांना आज जलमंदिर पॅलेस येथे २५ ऑक्सिजन कॉन्सट्रेटर व पल्स मीटर तसेच थर्मामीटर चे वाटप करण्यात आले .
व सर्वांनी एकत्र येऊन कोरोना विरुद्ध लढा देऊन कोरोनाला रोगाला सातारा जिल्ह्यातुन व देशातुन नष्ट करण्याची गरज आहे . असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.