Home Breaking News ठाकरे पितापुत्र आणि खा.सुप्रिया सुळे यांनी संपत्तीचे विवरण लपविल्याची तक्रार*

ठाकरे पितापुत्र आणि खा.सुप्रिया सुळे यांनी संपत्तीचे विवरण लपविल्याची तक्रार*

123
0

*ठाकरे पितापुत्र आणि खा.सुप्रिया सुळे यांनी संपत्तीचे विवरण लपविल्याची तक्रार*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा* *मराठा न्युज)*

कोणत्याही निवडणुकीत अर्ज भरताना उमेदवाराची संपत्ती आणि इतर विवरण यांची खरी माहिती द्यावी लागते. मात्र, त्यामध्ये काहीही लपवाछपवी केल्यास किमान ६ महिने तुरुंगवास होऊ शकतो. असेच प्रकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र व मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात दाखल झालेले आहे.
टाईम्स ऑफ इंडिया यांच्या बातमीत म्हटले आहे की, शिवसेनेचे ठाकरे पिता-पुत्र आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अशा पद्धतीच्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत. त्यांची चौकशी करून मगच कारवाईचा निर्णय ठरणार आहे. संपत्तीचे विवरण देताना काही गोष्टी लपवल्या असल्याचे त्या तक्रारीत म्हटलेले आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातही अशाच पद्धतीने गुन्ह्यांची माहिती लपवली असल्याचे एक प्रकरण प्रलंबित आहे. आता या तीन मोठ्या नेत्यांच्या विरोधात अशीच तक्रार दाखल झालेली आहे. एकूणच निवडणूक अर्ज भरताना अनेकदा गोंधळ केल्याच्या तक्रारी येतात उधे त्याच्या चौकशीत जास्त वेळ दवडला जातो. आताही या तीन नेत्यांच्या विरोधातील तक्रारीत कितपत तथ्य आहे हे समजण्यास किती वेळ लागणार हे काळच ठरवेल.

Previous article*प्रवासी क्षमता वाढवल्याने ३ *प्रवासी क्षमता वाढवल्याने ३१ हजाराने प्रवासी वाढले १ हजाराने प्रवासी वाढले* 
Next article*मराठा समाजाला ओबिसीत समाविष्ट करा,* *संभाजी ब्रिगेड.*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here