• Home
  • 🛑 UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२०: प्रवेश पत्र जारी🛑

🛑 UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२०: प्रवेश पत्र जारी🛑

🛑 UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२०: प्रवेश पत्र जारी🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 2 सप्टेंबर : ⭕ केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२० चे (प्रवेशपत्र) जारी करण्यात आले आहेत. ज्या उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत, ते upsconline.nic.in या संकेतस्थळामार्फत प्रवेश पत्र मिळवू शकतात.

यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२० च्या प्रवेशपत्र थेट लिंक या बातमीत पुढे देण्यात आली आहे. उमेदवार या लिंकवरून प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात.

➡️ UPSC CSE Prelims 2020: प्रवेशपत्र कार्ड कसं डाऊनलोड करायचं?

1) यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर जा. लिंक पुढे देण्यात आली आहे.

2) होम पेजवर व्हॉट्स न्यू सेक्शनमध्ये ई- प्रवेशपत्र सिव्हिल सर्व्हिसेस (पूर्व) परीक्षा २०२० लिंकवर क्लिक करा.

3) आता नवं पेज उघडेल. येथे सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिम्स एक्झाम २०२० च्या समोर क्लिक हियर लिंकवर क्लिक करा.

4) पुन्हा एक नवं पेज उघडेल. येथेयूपीएससी सिव्हिल सर्विस प्रीलिम्स एडमिट कार्ड 2020 च्या समोरील लिंकवर क्लिक करा. ई- प्रवेशपत्र इंस्ट्रक्शन पीडीएफ उघडेल. यात सर्वात शेवटी दिलेल्या प्रिंट टॅबवर क्लिक करा.

5) एक आणखी नवं पेज उघडेल. येथे रजिस्ट्रेशन आयडी किंवा रोल नंबर यापैकी एक पर्याय निवडा. हे पर्याय प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी आहेत. तुमचा आयडी किंवा रोल नंबर देऊन सबमीट करा.

6) आता तुमचं प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल. ते डाऊनलोड करा आणि एक प्रिंट घेऊन सुरक्षित ठेवा.

➡️ कधी होणार परीक्षा?

कोविड – १९ मुळे यूपीएससीने सिव्हिल सेवा पूर्व परीक्षा २०२० चे शेड्युलह बदलले होते. नव्या वेळापत्रकानुसार देशभर ४ ऑक्टोबर २०२० रोजी ही परीक्षा होणार आहे. प्रवेशपत्र परीक्षेच्या दिवसापर्यंत वेबसाइटवर उपलब्ध राहील. यादरम्यान परीक्षार्थी आपल्या सुविधेनुसार ते डाऊनलोड करू शकतात.

लक्षात घ्या की ई- प्रवेशपत्र प्रिंट आऊट, ओरिजनल फोटो आयडी प्रूफशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. विद्यार्थ्यांना आपलं प्रवेशपत्र सांभाळून ठेवावं लागेल. कारण याची गरज निकालाच्या घोषणेनंतर आणि त्यानंतरही लागेल.

डाऊनलोड करण्यासाठी थेट लिंकसाठी
https://upsconline.nic.in/eadmitcard/admitcard_csp_2020/admit_card.php#hhh1⭕

anews Banner

Leave A Comment