Home Breaking News 🛑 नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ‘ही’ कंपनी 300 ते 500 लोकांना देणार...

🛑 नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ‘ही’ कंपनी 300 ते 500 लोकांना देणार रोजगार 🛑

110
0

🛑 नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ‘ही’ कंपनी 300 ते 500 लोकांना देणार रोजगार 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 24 ऑगस्ट : ⭕ कोरोनाव्हायरसच्या संकटात नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. डिजिटल नेटवर्क सोल्यूशन्स प्रदान करणारी स्टरलाइट टेक्नॉलॉजी (Sterlite Technologies) चालू आर्थिक वर्षात सुमारे 300 ते 400 लोकांना रोजगार देणार आहे. 5 जी आणि वायरलेस सेक्टर वाढविण्यासाठी आणि जागतिक स्तरावर सर्व्हिसेसचा व्यवसाय करण्यासाठी कंपनी नवीन लोकांची भर्ती करणार आहे.

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद अग्रवाल म्हणाले की, कंपनी आवश्यक त्या क्षेत्रातील व्यावसायिकांव्यतिरिक्त या क्षेत्रांसाठी नवीन लोकांना (फ्रेशर्स) नियुक्त करेल. ते म्हणाले, आम्ही वायरलेस आणि 5 जी क्षेत्रात आमची स्थिती मजबूत करीत आहोत. या क्षेत्रांसाठी आम्ही लोकांना नोकरी देणार आहोत. आपली सर्व्हिस जागतिक स्तरावर नेण्याची कंपनीची योजना आहे आणि त्यासाठी नवीन लोकांची नेमणूक करण्याचीही तयारी करीत आहे.

अग्रवाल म्हणाले की, “आम्ही सातत्याने सध्याच्या अर्थव्यवस्थेचा विचार करत आहोत. सध्याच्या परिस्थितीत जे काही आर्थिक नुकसान होत आहे, यासाठी एक प्लॅन तयार केला जात आहे. यासाठीच स्टरलाइट टेक्नॉलॉजीज चालू आर्थिक वर्षात 300 ते 400 लोकांना नोकरी देण्याची अपेक्षा करीत आहे. आपला सेवा व्यवसाय जागतिक स्तरावर नेण्यासाठी कंपनी स्ट्रक्चरल दृष्टीकोन स्वीकारेल. सध्या, स्टरलाइट टेक आपली उत्पादने जगाच्या इतर देशांमध्ये फायबर आणि केबलमध्ये विकतात.

सेवा व्यवसायासाठी आपण अजूनही भारतीय बाजारावर लक्ष केंद्रित करत आहोत. आम्ही संरक्षण, दूरसंचार, स्मार्ट सिटी आणि ग्रामीण ब्रॉडबँड प्रकल्पांवर काम करत आहोत. तसेच, यावर्षी सेवा व्यवसायासाठी आंतरराष्ट्रीय बाजारात येण्याची कंपनीची योजना असल्याचेही अग्रवाल यांनी सांगितले.⭕

Previous article🛑 *पुणेकरांनो, पाणी उकळूनच प्या : पालिका* 🛑
Next article🛑 Arogya Setu Appचं नवं फिचर; कंपन्या घेऊ शकणार कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची माहिती 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here