• Home
  • 🛑 Arogya Setu Appचं नवं फिचर; कंपन्या घेऊ शकणार कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची माहिती 🛑

🛑 Arogya Setu Appचं नवं फिचर; कंपन्या घेऊ शकणार कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची माहिती 🛑

🛑 Arogya Setu Appचं नवं फिचर; कंपन्या घेऊ शकणार कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची माहिती 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 24 ऑगस्ट : ⭕ आरोग्य सेतू (Arogya Setu) ऍपमध्ये एक नवं फिचर ‘ओपन एपीआय सर्व्हिस’ (Open API Service) जोडण्यात आलं आहे. ज्याद्वारे कंपन्यांना आपल्या कर्मचारी आणि इतर यूजर्सच्या आरोग्याबद्दलची माहिती कोणत्याही गोपनीयतेचे उल्लंघन न करता मिळवता येणार आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, अधिकृत निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. तसंच आरोग्य सेतू जगातील सर्वाधिक डाऊनलोड केलेलं ऍप असून याच्या यूजर्सची संख्या आता 15 कोटींवर गेली आहे.

या नव्या ‘ओपन एपीआय सर्व्हिस’मुळे लोकांना, कंपन्या किंवा अर्थव्यवस्थेला सामान्य स्थितीत परत येण्यास मदत करेल. याचा हेतू कोरोनाची भीती कमी करणं हा आहे. देशातील अशा नोंदणीकृत संस्था आणि कंपन्या या सेवेचा लाभ घेण्यास सक्षम असतील, ज्यांची कर्मचारी संख्या 50 पेक्षा जास्त आहे. कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची माहिती घेऊ शकतात. त्यासाठी संबंधित व्यक्तीकडून त्याच्या आरोग्याची माहिती, यूनिटकडून शेअर करण्याची परवानगी घ्यावी लागणार आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हे फिचर कंपन्या किंवा अर्थव्यवस्थेला सुरक्षितपणे, सुलभ काम करण्यास मदत करेल. ओपन एपीआय (ऍप्लिकेशन प्रोग्राम इंटरफेस) आरोग्य सेतूची स्थिती किंवा आरोग्य सेतू यूजरचं नाव केवळ व्यक्तीच्या सहमतीनेच उपलब्ध करुन देण्यात येईल. याद्वारे कोणत्याही व्यक्तीचा डेटा शेअर करण्यात येणार आहे. या नव्या सर्व्हिससाठी रजिस्ट्रेशन करावं लागेल. आरोग्य सेतू ऍप 2 एप्रिल 2020ला सुरु करण्यात आलं होतं.⭕

anews Banner

Leave A Comment