Home Breaking News सी.पी.आर.मध्ये ४५० रुग्णांना* *आँक्सिजनची दररोज होणार सोय.*

सी.पी.आर.मध्ये ४५० रुग्णांना* *आँक्सिजनची दररोज होणार सोय.*

127
0

*सी.पी.आर.मध्ये ४५० रुग्णांना* *आँक्सिजनची दररोज होणार सोय.*

*कोल्हापूर(मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा* *मराठा न्युज)*

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे.
बाधित रूग्णाना उपचारांकरीता आँक्सिजनची कमतरता भासु लागल्यामुळे जिल्हा शासकीय रूग्णालयामधे (सी.पी.आर.)कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची तात्काळ सोय उपलब्ध व्हावी यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी युध्दपातळीवर निर्णय घेवून जिल्हा नियोजन समितीमधून २० हजार लिटरचा ऑक्सिजन टँक खरेदीला मंजुरी दिली. येथील सी.पी.आर. रूग्णालयामध्ये हा टँक बसविण्यात आला असून दिवसाला ४५० रुग्णांना ऑक्सिजनची सोय होणार असून शनिवारपर्यंत कार्यान्वित होणार आहे.
३० फूट उंच, २ मीटर व्यास असलेला हा लिक्विड टँक आज बसविण्यात आला. यासोबतच ४०० क्युबिक मीटर प्रतीतास क्षमतेचा वेपोरायझरही बसविण्यात आला आहे. २० हजार लीटर क्षमतेचा हा टँक असून यातील १ लीटर द्रवापासून ८५० लीटर वायूरुप ऑक्सिजन मिळणार आहे. या टँकमधून सीपीआरमध्ये १५ ठिकाणी असणाऱ्या ऑक्सिजन बँकमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे. तेथून पाईपलाईनद्वारे रुग्णांच्या खाटापर्यंत ऑक्सिजन सुविधा देण्यात येणार आहे.
पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी चन्नई येथील व्हीआरव्ही एशिया पॅसिफिक प्रा.‍ लि. कंपनीशी संपर्क साधून हा टँक मागवला आहे. सध्या पाईप जोडणीचे काम सुरु असून शनिवारपर्यंत या टँकमधून ऑक्सिजन पुरविण्याची सुविधा कार्यान्वित होईल, डॉ. उल्हास मिसाळ आणि बायोमेडिकल अभियंता वैजनाथ कापरे यांनी सांगितले.

Previous article🛑 IPL २०२०: ही कंपनी बीसीसीआयला देणार २२२ कोटी 🛑
Next article*राज्यात एस.टी.बसला आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीला राज्य सरकारचा हिरवा कंदील*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here