• Home
  • श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या 320 व्या जयंतीनिमित्त पुणे शनिवार वाडा येथे अभिवादन.

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या 320 व्या जयंतीनिमित्त पुणे शनिवार वाडा येथे अभिवादन.

पुणे १८ ऑगस्ट⭕(युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी)⭕ पुणे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या 320 व्या जयंतीनिमित्त पुणे शनिवार वाडा येथे अभिवादन.
यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ पेशवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण जी गोखले पेशव्यांचे वंशज श्री उदयसिंह पेशवे पेशवा प्रतिष्ठानचे सेक्रेटरी श्री कुंदन जी साठे माजी महापौर बाळासाहेब शिवरकर श्री अनिल जी गणू परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत जी देशपांडे हर्षल देशपांडे सागर देशपांडे पेशवे कुटुंबासह अनेक पेशवे प्रेमी उपस्थित होते
यावेळी बोलताना एअर मार्शल भूषण गोखले यांनी शनिवार वाड्याच्या आत पूर्वी निर्माण केलेला व आता बंद असलेला लाईट शो सुरू करणे तसेच शनिवार वाड्याच्या आतील मूळ वास्तुची प्रतिकृती निर्माण करण्याची इच्छा व्यक्त केली . त्याला महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महापालिकेच्या माध्यमातून पुरातत्व खात्याची परवानगी घेऊन हे काम लवकरच सुरुवात करण्यात येईल असे आश्वासन दिले

anews Banner

Leave A Comment