• Home
  • *सराड गावातील महादेव कोळी जमातीकडून अमरधाम बांधणीसाठी सराड ग्रामपंचायतला निवेदन*

*सराड गावातील महादेव कोळी जमातीकडून अमरधाम बांधणीसाठी सराड ग्रामपंचायतला निवेदन*

*सराड गावातील महादेव कोळी जमातीकडून अमरधाम बांधणीसाठी सराड ग्रामपंचायतला निवेदन*(युवा मराठा न्युज तालुका प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड )
सुरगाणा तालुक्यातील सराड या गावात महादेव कोळी या समाजाची संख्या ही अधिक प्रमाणात आहे. या समाजातील लोकांना अंत्यविधी करण्यासाठी गेली कित्येक वर्षांपासून अमरधाम ची सोय नाही. त्यामुळे त्यांना मोकळ्या जागेत अंत्यविधी करावा लागतो. म्हणून या समाजातील लोकांची खूप गैरसोय होत असते. तसेच स्मशानभूमी पर्यन्त जाण्यासाठी रस्ता नसल्याने अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. या समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी सराड गावातील संपूर्ण महादेव कोळी समाजाच्या लोकांनी मिळून सराड ग्रामपंचायतला निवेदन देण्यात आले आहे. यावेळी कैलाश गवळी, जगदीश पीठे, कांतीलाल गवळी, रामदास गवळी आदी युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment