• Home
  • *विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू*

*विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू*

*विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू*(युवा मराठा न्युज सुरगाणा तालुका प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड )
सुरगाणा तालुक्यातील मानी या गावातील आश्रम शाळेजवळ दोन मोटरसायकल स्वार रस्त्यावरून जात असताना अचानक विजेचा खांब कोसळला विजेच्या तारा रस्त्यावर आल्या व त्यामुळे एका व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले. तर दुसऱ्याला विजेचा शॉक लागल्यावर तो लांब फेकला गेल्याने त्याचा जीव वाचला.
सुरगाणा तालुक्यात सद्या वादळी पावसाने जोर धरला असून जमीन ही ढिसूळ झाली असून त्यामुळे ही दुर्घटना घडली असावी असा अंदाज आहे.

anews Banner

Leave A Comment