#जनतेच्या_रक्षकांसोबत_रक्षाबंधन_सण_साजरा💫🇮🇳
सुराज्य युवतींनी सर्व पोलीसांना ओवाळुन राखी बांधुन त्यांना #आभारपत्र देऊन त्यांच्या कार्याचे शतशः आभार मानून रक्षाबंधन साजरे केले 🇮🇳💫🙏 रायगड (अक्षय जाधव ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)-
सैनिकांना राखी पाठविल्यावर रक्षाबंधनाचे औचित्य साधुन रोहा व कोलाड मधील सर्व पोलीस तसेच कर्मचारी वर्ग,प्रांताधिकारी,तहसीलदार यांना सुराज्यच्या रणरागिनींने राखी बांधुन ओवाळले व त्यांच्या कार्याचे आभार मानून त्यांना आभारपत्र देण्यात आले.
कोरोना योद्धा म्हणून पोलिसांचे कार्य कौतुकास्पद आहे. सुराज्य नेहमीच प्रशासन आणि पोलिसांना सहकार्य करत आली आहे.
तांबडीमधील #महिला_अत्याचार प्रकरणात पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल त्यांचे धन्यवाद मानताना आरोपींना कडक कारवाई करण्याची मागणी सुराज्य युवतींनी केली.
यावेळी रोहा पोलीस निरीक्षक श्री.#नामदेव_बंडगर यांनी कोरोना काळात सुराज्यच्या उपक्रमाचे कौतुक करत महिला सुरक्षासाठी पोलीस प्रशासन सदैव तत्पर असल्याचे सांगितले.सुराज्य समाजात चांगले कार्य करते आणि पोलीस प्रशासनाला साथ देत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या उपक्रमात रोहा पोलीस स्टेशनचे श्री.नामदेव बंडगर,श्री.सुभाष जाधव,श्री.अडगळे सर श्री.कमलेश चांदेकर (महिला समुपदेशन) सर्व पोलीस सहकारी तसेच कोलाड पोलीस स्टेशनचे श्री.#पी_एस_तायडे
आदीसह पोलीस स्टाफ, कर्मचारी वर्ग, हे उपस्थित होते.
रोहा #प्रांताधिकारी श्री.यशवंतराव माने, #तहसीलदार सौ.कविता जाधव यांना आभार पत्र देण्यात आले.
सदर उपक्रमावेळी सुराज्यचे युवती सदस्य आरती देशमुख,प्रिया जंगम,ममता शिंदे,विशाखा पाटील,दिपाली कानडे,रश्मी देशमुख,अक्षता चौलकर,रिया कासार तसेच किरण कानडे,मयूर धनावडे,विनीत वाकडे,सौरभ भगत,परेश चितळकर,प्रसाद पाटूकले,राहुल पोकळे हे सदस्य उपस्थित होते.
कु.#आरती_देशमुख यांनी सदर उपक्रमाची कार्यक्रम प्रमुख म्हणुन जबाबदारी पार पाडली.