• Home
  • आय.जी.एम.इस्पितळाची बदनामी करणारी क्लिप दोघांना अटक.*

आय.जी.एम.इस्पितळाची बदनामी करणारी क्लिप दोघांना अटक.*

*आय.जी.एम.इस्पितळाची बदनामी करणारी क्लिप दोघांना अटक.*

कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्यूज)
हातकणंगले तालूक्यातील इचलकरंजी येथील शासकीय इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या अनुषंगाने बदनामीकारक संभाषणाची ऑडिओ क्लिप तयार करुन ती सोशल मिडीयावर व्हायरल केल्या प्रकरणी  गावभाग पोलिसांच्या पथकाने अभिजित यशवंत कुलकर्णी व ऋषिकेश ओझा दोघे (रा. राजराजेश्वरीनगर) या दोघाना  ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. संभाषण करणारा कोरोनाबाधित युवकाचे नांवही निष्पन्न झाले आहे.

इचलकरंजी शहरातील तील
तात्यासो मुसळे विद्यालयातील कोविड सेंटरमधील सुविधा तसेच इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय या अनुषंगाने दोघा तरुणांमधील संभाषणाची ऑडिओ क्लीप सोशल मिडीयावर व्हायरल झाली. ‘आयजीएममध्ये दाखवण्यास गेल्यास सगळ्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह कराल्यात बघ’ यासह बदनामीकारक मजकूर असल्याने रुग्णालयाची बदनामी होत असल्याने या प्रकरणी रुग्णालयाचे कार्यालयीन अधिक्षक अविनाश चिले यांनी शिवाजीनगर पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार शिवाजीनगर पोलिसात दोघा अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  गावभागचे सपोनि गजेंद्र लोहार व त्यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीवरुन अभिजित कुलकर्णी व ऋषिकेश ओझा यांना ताब्यात घेतले. मुसळे हायस्कूलमधील कोविड सेंटरमध्ये उपचार घेणार्‍या युवकाला कुलकर्णी याने फोन केला होता. त्यांच्यातील संभाषणाची क्लिप त्याने शेजारीच राहणार्‍या ओझा याला टाकली होती. ती क्लिप ओझा याने पुणे येथे असणाऱ्या दोघा  नातेवाईकांना टाकली. तेथून ती क्लिप सोशल मिडीयावर सर्वत्र व्हायरल झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. कोरोनाबधित संशयितांवरही उपचार पूर्ण झाले नंतर कारवाई करण्यात येणार आहे.

anews Banner

Leave A Comment