• Home
  • *अखेर पगाराचा तिढा सुटला.*

*अखेर पगाराचा तिढा सुटला.*

*अखेर पगाराचा तिढा सुटला.*

कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्यूज)

महाराष्ट्र राज्य परिवहन खात्याचे मंत्री अनिल परब यांची महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर साहेब यांनी भेट घेतली. याप्रसंगी एसटी कर्मचाऱ्यांचा पगार संदर्भात सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी आग्रह केला असतांना परिवहन मंत्री यांनी काल झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत एसटी महामंडळाला २००० कोटी रुपये अर्थसहाय्य देण्याबाबत चर्चा झाली असुन एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी लागणारी रक्कम त्वरित महामंडळाला देण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसाच्या आतच एसटी कर्मचाऱ्यांना पगार अदा करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री महोदयांनी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस मा. हिरेनजी रेडकर यांना दिली.
तसेच 50 लाखाचा विमा सर्व एस.टी. कर्मचाऱ्यांना सरसकट लागू करण्यात यावा, वीस दिवसाच्या रजा सक्तीच्या आदेशाला स्थगिती व नविन कर्मचा-यांच्या सेवा खंडित करण्याच्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी महाराष्ट्र एसटी. कामगार सेनेचे सरचिटणीस रेडकर यांनी केली असता परिवहन मंत्री अनिल परब यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे.
त्यामुळे लवकरच याबाबत
महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर होणार असल्याचे संकेत मिळाले आहे.

anews Banner

Leave A Comment