Home Breaking News 🛑 ग्लोबल हॉस्पिटलमधील खाटांसाठी राष्ट्रवादी करणार आंदोलन…! 🛑 ✍️मुंबई :( विजय पवार...

🛑 ग्लोबल हॉस्पिटलमधील खाटांसाठी राष्ट्रवादी करणार आंदोलन…! 🛑 ✍️मुंबई :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

65
0

🛑 ग्लोबल हॉस्पिटलमधील खाटांसाठी राष्ट्रवादी करणार आंदोलन…! 🛑
✍️मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

परळ/मुंबई :⭕ परळमधील बड्या ग्लोबल रुग्णालयातील महापालिकेच्या वाट्याच्या पंधरा टक्के खाटा गरिबांना मिळण्याबाबत महापालिकेने अंमलबजावणी केली नाही, तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्य सरचिटणीस बबन कनावजे यांनी दिला आहे. परळमधील हे रुग्णालय महापालिकेच्या जागेवर बांधण्यात आले आहे, या संदर्भातील करारातच रुग्णालयातील पंधरा टक्के खाटा महापालिकेच्या रुग्णांसाठी राखीव ठेवाव्यात, अशी तरतूद करण्यात आलेली आहे.

मुंबई महापालिकेचे कार्यकारी अधिकारी सांगतील त्या रुग्णांवर महापालिका रुग्णालयांच्या दरात उपचार करावेत, असे त्यात म्हटले होते. मात्र, या अटीची केव्हाही अंमलबजावणी झाली नाही, असा दावा कनावजे यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी समाज माध्यमांवरून संवाद साधताना आंदोलनाचा इशारा दिला आहे.

रुग्णालय बांधताना तेथे मैदान तयार करून देण्याचीही अट होती, मात्र तीदेखील पाळण्यात आली नाही. या दोनही अटींचा नागरिकांना कोणताही फायदा झाला नाही. परिसरातील लोकप्रतिनिधींनीदेखील यासाठी कधीही आग्रह धरला नाही. या अटी कळल्यावर आपण सर्व प्रकरण तपासून धसास लावण्याचा निर्णय घेतला.

संबंधित महापालिका अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला. त्यावेळी या संदर्भात सामंजस्य करार करून या खाटा आपल्या ताब्यात घेण्यात येतील व गरीब रुग्णांना त्याचा लाभ मिळवून देण्यात येईल, असे आश्वासन महापालिका प्रशासनाने वर्षभरापूर्वी दिले होते. तरीही यासंदर्भात पुढे काहीही हालचाली झाल्या नाहीत, असे कनावजे यांचे म्हणणे आहे.

रुग्णालयाचा फायदा व्हावा म्हणून महापालिकेच्या एफ दक्षिण विभागाचे अधिकारी संगनमत करून येथील महापालिकेच्या वाट्याच्या खाटा ताब्यात घेत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. या संदर्भात आपल्याला सर्वपक्षीय नेते-कार्यकर्ते संपर्क साधत असून त्यांनीही या लढ्यासाठी पाठिंबा देऊ केला आहे.

त्यामुळे लवकरच आम्ही एकजुटीने आंदोलन करू, या संदर्भात काही दिवसांतच निर्णय घेतला जाईल.
गरिब रुग्णांना गेली दहा वर्षे खाटा न मिळाल्याने त्यांचा झालेला तोटा रुग्णालयाने भरून द्यावा, अशी मागणीही कनावजे यांनी केली.

मुंबई महापालिकेने दोन ते तीन दिवसांतच याबाबत निर्णय घ्यावा; अन्यथा नंतर काय होईल, त्याची जबाबदारी आमची राहणार नाही, असेही त्यांनी सुनावले आहे….⭕

Previous article🛑 या..गायकाचा सवाल..? टाळ्या थाळया वाजवल्या, आता DJ वाजवून बघूया का…?? 🛑 ✍️मुंबई :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
Next article**सुप्रीम कोर्टात आज मराठा आरक्षणावर निर्णय**✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here