• Home
  • 🛑 आनंद महिंद्रा यांनी केले मुंबईच्या ‘या’ आगळ्यावेगळ्या रिक्षाचे कौतुक 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 आनंद महिंद्रा यांनी केले मुंबईच्या ‘या’ आगळ्यावेगळ्या रिक्षाचे कौतुक 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 आनंद महिंद्रा यांनी केले मुंबईच्या ‘या’ आगळ्यावेगळ्या रिक्षाचे कौतुक 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 14 जुलै : ⭕ उद्योजक आनंद महिंद्रा नेहमीच नवनवीन संशोधनाला प्रोत्साहन देत असतात. एखाद्या राज्यात, शहरात तंत्राचा वापर करून सुसह्य वस्तू बनवल्यास त्या व्यक्तीचे सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर कौतुक करायला ते कधीही विसरत नाहीत. असाच एक आगळावेगळा व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. ही कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर बनवण्यात आलेली स्वच्छता व सुरक्षेच्या दृष्टीने सज्ज असलेली अशी ऑटोरिक्षा आहे. या व्हिडिओसोबत त्यांनी कॅप्शन दिली आहे की, कोविड १९ ने स्वच्छ भारत उपक्रमाला प्रोत्साहित केले आहे. या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेल्या रिक्षात सॅनिटायझर, वॉशबेसिन, वायफाय, झाडं, रोपटे ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे या रिक्षात सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. तसेच या रिक्षात दोन प्रकारचे कचऱ्याचे डबे असून एकात सुका कचरा तर एकात ओला कचरा ठेवता येणार आहे.

आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ १० जुलै रोजी शेअर केला होता. आतापर्यंत या व्हिडिओला ३९५ हजारपेक्षाही अधिक वेळा पाहिले गेले आहे. तसेच ६ हजारहून जास्त रिट्विट आणि ३५ हजार लाईक्स मिळाले आहे. या व्हिडिओवर नेटिझन्सने विविध प्रकारच्या कमेंट केल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हात स्वच्छ ठेवणे, सतत हात धुळे, सॅनिटायझर लावणे, मास्क परिधान करणे या सुरक्षेच्या उपायांचे पालन करण्यात सांगितले जात आहे. अशावेळी रिक्षामध्ये या सर्व वस्तू उपलब्ध करून हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला आहे.⭕

anews Banner

Leave A Comment