सावधान : लग्नाला जाणा-यावर गुन्हा दाखल होणार ! आता विवाहासाठी 20 लोकांनाच परवानगी प्रतिनिधी :- प्रविण अहिरराव
वर्धा l मुला मुलीचे लग्न करणा-यासाठी धोक्याची घंटा म्हणावी लागेल. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून लाॅकडाऊन करण्यात आला आहे.मात्र काही परीसरात लाॅकडाऊन शिथील करण्यात आल्याने त्या भागात लग्न समारंभासाठी ५० ते १०० लोकांना परवानगी दिली जात होती मात्र वाढत्या कोरोनाच्या प्रार्श्वभुमीवर आता विवाहासाठी 20 लोकांनाच परवानगी मिळणार असल्याचा आदेश वर्धा जिल्हाधिका-यांनी जारी केला आहे.
मात्र 20 पेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास आयोजक आणि मंगल कार्यालयावर 10 हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. जिल्ह्यात लग्नामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांचे नवीन आदेश जारी केला आहे.
ज्याअर्थी संदर्भीय आदेश क्रमांक 5 अन्वये वर्धा जिल्ह्याअंतर्गत 50 लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा
पार पाडण्याकरीता परवानगी देण्यात आली आहे परंतु बरेच लोक परवानगी न घेता विवाह सोहळ्याकरीता उपस्थित राहत असल्याचे माझे निदर्शनास आले आहे. त्याअर्थी मी, विवेक भीमनवार, जिल्हादंडाधिकारी, बर्धा विवाह सोहळ्याकरीता खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून वर्धा जिल्ह्याअंतर्गत परवानगी देत आहे.अटी व शर्ती..
1. विवाह सोहळ्याकरीता फक्त 20 व्यक्तीनाच (वधु पक्षाकडील 10 व्यक्ती व वर पक्षाकडील 10
व्यक्ती) उपस्थित राहता येईल.
2. विवाह सोहळ्याकरीता उपस्थित असणाच्या सर्व व्यक्तींना 14 दिवसांकरीता विलगीकरणात राहणे
अनिवार्य राहील.