- *युवा मराठा न्युजच्या पत्रकारांची विभागीय बैठक साल्हेरला उत्साहात संपन्न*वा मराठा न्युज चँनलच्या मालेगाव सटाणा देवळा कळवण आणि सुरगाणा तालुक्यातील पत्रकारांची विभागीय बैठक काल शनिवारी दि,११ रोजी वनविभागाच्या शासकीय विश्रामगृहावर अत्यंत उत्साही वातावरणात पार पडली.
या बैठकीस मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत, नाशिक जिल्हा ब्युरो चीफ दिपक भावसार,विभागीय संपादक नारायण भोये,सटाणा तालुका प्रतिनिधी जयवंत धांडे आदीनी मार्गदर्शन केले.साल्हेर येथे युवा मराठा न्युज चँनलच्या सुरु असलेल्या विभागीय कार्यालयाच्या बांधकामाची पाहणी सगळ्या पत्रकार बांधवानी करून समाधान व्यक्त केले.तर शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत बोलताना मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत म्हणाले की,युवा मराठा न्युजचा प्रत्येक पत्रकार हा आमचा कौटुंबिक सदस्य असून,त्यांच्या अडीअडचणी सुख दुःख संकट वा इतर बाबतीत युवा मराठा समर्थपणे त्यांच्या पाठीशी एकजुठीने उभा आहे.या बैठकीस व्यवस्थापकीय संपादक श्रीमती आशाताई बच्छाव,विभागीय संपादक नारायण भोये,निवासी संपादक राहुल मोरे,वृतसंपादक प्रमोद पवार,शिवाय पत्रकार पांडूरंग गायकवाड (सुरगाणा),बाळासाहेब निकम (कळवण तालुका),आनंद नागमोती(कळवण शहर),जयवंत धांडे(सटाणा तालुका), सतिश घेवरे (मालेगांव तालुका) नाना अहिरे मालेगांव,युवराज देवरे दहीवड,किरण अहिरराव उमराणे,समाधान बहिरम ताहराबाद, प्रवीण अहिरराव लोहणेर,दादाजी हिरे वाखारी,विशाल बच्छाव व-हाणे,दिपक भावसार मालेगांव,आंशूराज पाटील राऊत मालेगांव,विजय अहिरराव मालेगांव, राहूल भोसले मालेगांव आदीजण बहुसंख्येने उपस्थित होते.शेवटी बैठकीचा समारोप स्नेहभोजनाने पार पडला.तर पुढील राज्यस्तरीय बैठक लवकरच शिर्डी येथे घेण्यात येणार असल्याचे जाहिर करण्यात आले.
Home Breaking News *युवा मराठा न्युजच्या पत्रकारांची विभागीय बैठक साल्हेरला उत्साहात संपन्न* *साल्हेर दि.११(विभागीय कार्यालय...