Home Breaking News नवी मुंबई : कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे आता नवी मुंबईत सुरू असणारा लॉकडाऊन...

नवी मुंबई : कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे आता नवी मुंबईत सुरू असणारा लॉकडाऊन आणखीन दहा दिवसांनी वाढवण्यात आला आहे. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी टाळेबंदी दहा दिवस वाढवण्याचा निर्णय घेतला

192

नवी मुंबई : कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे आता नवी मुंबईत सुरू असणारा लॉकडाऊन आणखीन दहा दिवसांनी वाढवण्यात आला आहे. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी टाळेबंदी दहा दिवस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी 3 जुलै पासून 13 जुलैपर्यंत हा लॉकडाऊन सर्व हॉटस्पॉटमध्ये सुरू राहणार आहे.

नवी मुंबई शहरातील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा थांबण्याचा नाव घेत नाही. आजही शहरात 218 कोरोनाबाधित नावे रुग्ण आढळून आले तर सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेऊन पोलीस आयुक्तालयात झालेल्या बैठकीत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी 29 जून पासून 5 जुलै पर्यंत सात दिवसांचा लॉकडाऊन घेण्याचे आदेश महापालिका आणि पोलिसांना दिले होते.