Home Breaking News मोठी बातमीःराष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पातून चीनची सुट्टी प्रतिनिधी : प्रविण अहिरराव दिल्लीः 

मोठी बातमीःराष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पातून चीनची सुट्टी प्रतिनिधी : प्रविण अहिरराव दिल्लीः 

115
0

मोठी बातमीःराष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पातून चीनची सुट्टी प्रतिनिधी : प्रविण अहिरराव दिल्लीः  राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पात सहभागी होण्यास चिनी कंपन्यांवर बंदी घालण्यात आली आहे. संयुक्त उपक्रमांच्या माध्यमातूनही चिनी कंपन्यांना शिरकाव करण्यास मज्जाव केला जाईल, लडाखमध्ये सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर चिनी अ‍ॅपवरील बंदीपाठोपाठ चिनी कंपन्यांची आर्थिक कोंडी करण्याचा पवित्रा केंद्र सरकारने घेतला आहे. अशी घोषणा केंद्रीय रस्ते-परिवहन व राष्ट्रीय महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी केली.

चिनी कंपन्याऐवजी देशी कंपन्यांना महामार्ग प्रकल्पांमध्ये अधिकाधिक सहभागी करून घेण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. प्रक्रिया सुरू झालेल्या प्रकल्पांमध्ये चिनी कंपन्यांचा सहभाग असेल तर नव्याने निविदा काढण्यात येतील. त्यासाठी अटी व शर्ती शिथिल केल्या जाऊ शकतात. तसे धोरण लवकरच केंद्र सरकार जाहीर करेल, असे नितीन गडकरी यांनी ‘पीटीआय’शी बोलताना स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here