Home Breaking News युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे ढाब्यावर, राष्ट्रवादीच्या नेत्या ची जंगी...

युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे ढाब्यावर, राष्ट्रवादीच्या नेत्या ची जंगी मिरवणूक कोरूना च्या पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर शासकीय नियमांची पायमल्ली होत असल्याचे चित्र समोर आले

143
0

युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे ढाब्यावर, राष्ट्रवादीच्या नेत्या ची जंगी मिरवणूक कोरूना च्या पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर शासकीय नियमांची पायमल्ली होत असल्याचे चित्र समोर आले आहे राज्यभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे संसर्ग वाढू नये यासाठी दोन व्यक्तींमध्ये अंतर ठेवण्याचं सरकार कडून वारंवार आवाहन केले जात आहे पण शिरूर बाजार समितीच्या सभापती निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित सभापती शंकर जांभळकर यांची त्यांच्या करंदी गावात जंगी मिरवणूक काढून गुलालाची उधळण ही करत कार्यकर्त्यांनी डीजे हलगीच्या तालावर ताल धरत डान्स केला मात्र यावेळी राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचा पार धज्जा उडविण्यात आला, शिरूर तालुक्यातील मोराची चिंचोली येथे मागील आठवड्यात एका लग्न समारंभात एकत्र येत नवरदेवाची वरात काढली तर मंगळवारी कोरेगाव भीमा येथे 30 हून अधिक युवक एकत्र येत वाढदिवस साजरा केला या दोन्ही प्रकरणी पोलिसांनी नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे परंतु शिरूर तालुक्यात बाजार समितीच्या सभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीनंतर नवनिर्वाचित सभापतीची गावांमध्ये मिरवणूक काढण्यात आली यावेळी डीजे हलगीच्या तालावर ताल धरणाऱ्या युवकांच्या तोंडावरती मास्क दिसले नव्हते ना सार्वजनिक अंतर पाळले होते आता दोन दिवसानंतर या मिरवणुकीची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे मात्र त्यानंतर देखील प्रशासनाकडुन कोणतीही खबरदारी घेण्यात आली नाही आणि मिरवणूक काढणाऱ्या नागरिका वर कारवाई सुद्धा झाली नाही एकंदरीत शिरूर तालुक्यातील दोन ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिरूर व शिक्रापूर पोलिसांनी कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत मात्र करंदी येथे घडलेल्या घटनेवर पोलीस काय भूमिका घेणार की राजकीय दबावाला बळी पडणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here