• Home
  • संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे एसटीने फाडले तिकीट ! प्रतिनिधी= किरण अहिरराव

संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे एसटीने फाडले तिकीट ! प्रतिनिधी= किरण अहिरराव

संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे एसटीने फाडले तिकीट !

प्रतिनिधी= किरण अहिरराव

आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरला विठू माऊलीच्या भेटीसाठी शिवशाही बस मधून जाणाऱ्या त्रंबकेश्वर येथील संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी चे ७१ हजार रुपये तिकीट एसटी महामंडळाने फाडले आहे. त्यामुळे एरवी लोकसहभागातून कसलाही खर्च न होता होणारी निवृत्तीनाथ महाराजांची पायी वारी यावर्षी मात्र सशुल्क करावी लागली शासनाने विनामूल्य बस उपलब्ध करून देण्यास असमर्थता दाखविल्याने आहे परिवहन मंडळाचे संवेदनशील कामगिरीत त्यानिमित्ताने समोर आली.

यंदा कोरोनामुळे पाई आषाढी वारी वर शासनाने निर्बंध घातले त्यामुळे राज्यभरातील प्रमुख सात संतांच्या पालख्या पंढरपूरला नेण्याकरता शासनाकडून शिवशाही बस उपलब्ध करून दिली जाईल असे सुरुवातीला सांगण्यात येत होते काही संतांच्या पालखी साठी हेलिकॉप्टरची ही चर्चा झाली होती त्यामुळे शासन विनामूल्य सेवा उपलब्ध करून देणार, परंतु सोमवार पर्यंत शासनाकडून कसल्याही आदेश प्राप्त झाला नव्हता.

अखेर संस्थांनी तीन दिवसाच्या मुक्कामावर ७१हजार रुपये प्रवासभाडे भरल्यानंतर अखेर मंगळवारी सकाळी महामंडळाने शिवशाही बस उपलब्ध करून दिली.

anews Banner

Leave A Comment