• Home
  • नाशिक – देवळा तालुक्यात पुन्हा एकाला कोरोनाची बाधा l तालुक्याचा आकडा 9 वर प्रतिनिधी किरण अहिरराव

नाशिक – देवळा तालुक्यात पुन्हा एकाला कोरोनाची बाधा l तालुक्याचा आकडा 9 वर प्रतिनिधी किरण अहिरराव

नाशिक – देवळा तालुक्यात पुन्हा एकाला कोरोनाची बाधा l तालुक्याचा आकडा 9 वर

प्रतिनिधी किरण अहिरराव

दहिवड l देवळा तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून आताच तालुका प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालात सरस्वतीवाडी येथील २७ वर्षीय युवकास कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉ.सुभाष मांडगे यांनी युवा मराठा न्यूज ला दिली आहे दिली आहे.

खर्डे,दहिवड व सरस्वतीवाडी येथील प्रत्येकी एक संशयित रुग्ण चांदवड येथील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरला उपचार घेत होते तेथून त्यांच्या घशाचे स्त्राव तपासणी पाठविण्यात आले होते यादरम्यान सरस्वतीवाडी येथील संशयित २७ वर्षीय युवकास अधिक त्रास जाणवू लागल्याने मंगळवारी नाशिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

खर्डे,दहिवड व सरस्वतीवाडी येथील तिघंही संशयित रुग्णांचे प्रलंबित असलेले कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये खर्डे,दहिवड येथील संशयित रुग्ण निगेटिव्ह तर सरस्वतीवाडी येथील २७ वर्षीय युवक पॉझिटिव्ह आला असून हा युवक नाशिक येथे एका खाजगी कंपनीत कामाला असल्याचे समजते.

anews Banner

Leave A Comment