Home Breaking News धनगर – मराठा वाद पेटवा..!म्हणुन पडवळकरांना विधानपरिषदेवर भाजपकडून संधी… ✍️सोलापूर ( विजय...

धनगर – मराठा वाद पेटवा..!म्हणुन पडवळकरांना विधानपरिषदेवर भाजपकडून संधी… ✍️सोलापूर ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

131
0

🛑 धनगर – मराठा वाद पेटवा..!म्हणुन पडवळकरांना विधानपरिषदेवर भाजपकडून संधी…🛑
✍️सोलापूर ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

सोलापूर :⭕राष्ट्रवादीच्या सक्षणा सलगर, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व उत्तम जानकर हे राजकीय नेते आपापल्या पक्षाच्या दावनीला बांधलेले नेते आहेत. ते त्यांच्या पक्षासाठी काम करत आहेत. पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यांच्यावर टिका करत असताना त्यांनी धनगर आहेत म्हणून केलेली नाही तर भाजपचे आमदार आहेत म्हणून ती टिका केली आहे. सक्षणा सलगर या नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्यांच्यावर टिका करतात, पण ती त्यांच्या वयक्तीक स्वार्थासाठी आहे. पडळकर यांचे राजकाण हे धनगर समाजासाठी नाही.

भाजपने पडळकर यांना मराठा- धनगर वाद पेटावा म्हणून त्यांना विधानपरिषदेवर संधी दिली. पडळकार हे धनगर व मराठा यांच्यात वाद पेटवायला यशस्वी झाले तर भाजप सत्तेत येईल.
म्हणून पडळकर यांनी पवारांवर वादग्रस्त विधान केले असल्याचा घनाघाती आरोप संतोष बिचुकले यांनी केला आहे. त्यांनी माळशिरस तालुक्यातील उत्तमराव जानकर यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला आहे.
संतोष बिचुकले यांनी दोन दिवसांपूर्वी फेसबुकवर लाईव्हवर संवाद साधला. त्यांना अनेकांनी प्रतिसादही दिला आहे. दोन दिवसात त्यांच्या व्हिडीओला आठ हजार व्ह्युज मिळाले असून २५५ लाईक व ५१ काँमेंट आल्या आहेत. बिचुकले हे फलटण येथील आहेत, पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी असल्याचे त्यांच्या फेसबुक प्रोफाईलवर म्हटलं आहे. भाजपचे आमदार पडळकर यांनी पंढरपुरात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटले. त्यावर बिचुकले यांनी संताप व्यक्त करत धरनगर समाजाच्या आरक्षणावर भाष्य केले आहे. त्यांनी म्हटलंय की, सक्षणा सलगर या खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांना सांगू शकतात का? तुम्ही धनगर आरक्षणाचा प्रश्‍न टामपणे मांडा असं सांगू शकतात का? आमदार पडळकर हे केंद्रात नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांना सांगू शकतात का धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍न सोडवा. जनकर यांनी परवा एक विधन केले. ते म्हणाले मी काय बोललो तर आमदार पडळकर हे भाजपमध्ये राहणार नाहीत. म्हणजे जानकर व पडळकर यांनी धनगर आरक्षणाच्या बाबतीत काही सेटलमेंट केली आहे. आपल्या समाजाचे आमदार, खासदार व नेते यांचा समाजाला काही उपयोग आहे का असा प्रश्‍न त्यांनी केला आहे. बांधवांनो राजकीय नेते आपल्या वयक्तीक स्वार्थासाठी आपल्या समाजाचा विचार करत नाहीत. पडळकर यांचे विधान हे नक्कीच चुकीचे आहे. महाराष्ट्रातील एका वरिष्ठ नेत्याबद्दल टिकाटिपणी करताना विचार करायला हवा. पडळकरांचे विधान हे भाजपसाठी प्लस पॉइंट होते. पण यांने समाजाचे नुकसान झाले आहे. पडळकर हे मोदींसमोर जनजाती आयोग यांच्यासमोर देशात धनगड समाज नाही हे सांगावे. महाराष्ट्रात धनगर आरक्षणाबाबत धनगड जात उलब्ध केली जात आहे. पण धनगड समाज जात अस्तित्वहीन आहे. आम्हाला धनगड दाखवा नाहीतर आम्हाल प्रमाणपत्र द्या,
असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी व्हिडीओमध्ये काँग्रेस- राष्ट्रवादी व भाजपवरही आरक्षणाबाबत केलेल्या कामकाजाचा आढावा घेऊन कशी फसवणूक होत आहे याचा समाचार घेतला आहे.
बिचुकले यांच्या व्हिडीओवर अभिजीत शिंदे यांनी म्हटल आहे की, सांगलीत लोकसभा निवडणूकीत वंचितमुळे अभ्यासू नेतृत्त्वाला आपण मुकलो. असरामजी सुससादे यांनी म्हटलं की, एकजुटेन लढा देण्याची गरज आहे. सुनील चिंधे यांनी म्हटलंय की, संतोष बिचुकले यांनी सत्य मांडणी केली आहे. पण ध्येय समोर ठेऊन वाटचाल करावी लाणार आहे. गजानन भोरसे यांनी म्हटलंय की, तुम्ही समाजासाठी काय करणार आहात. पुढील दिशा काय असणार. नकोल पाटील यांनी कोणत्या नेत्यावर विश्‍वास ठेवायचा असा प्रश्‍न केला आहे. ⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here