🛑 गोव्याची मजा कोकणात! बीच शॅक्सने स्थानिकांना ८०% रोजगार – आदित्य ठाकरे 🛑
✍️ मुंबई ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
मुंबई :⭕पर्यटन आणि रोजगार याची सांगड घालण्याच्या दृष्टीने पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या विभागाच्या मोठ्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. गोव्यासारखं पर्यटन आता कोकणात अनुभवता येणार आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर या चार जिल्ह्यात आठ ठिकाणी बीच शॅक्स अर्थात चौपाटी कुटी ही संकल्पना लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे. महत्त्वाचं म्हणजे पर्यटनासोबत इथे चार जिल्ह्यातील 8 बीच शॅक्सवर 80 टक्के स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल, असा राज्य सरकारचा दावा आहे. (Konkan Beach Shacks)
गोव्यापेक्षा उत्तम पर्यटन कोकणात उभं करण्याचा चंग राज्य सरकारने बांधला आहे.
यातून कोकणातील स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल, असा राज्य सरकारचा दावा आहे.
याठिकाणी चहा, नाश्ता, भोजन आणि मर्यादित स्वरुपात बियर देखील विकण्याची परवानगी दिली जाणार आहे. सोबतच कोणतेही कायमस्वरूपी बांधकाम न करता स्थानिकांना रोजगाराची संधी यातून निर्माण होईल, अशी माहिती काल सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.
रत्नागिरीतील आरे वारे आणि गुहागर येथे प्रायोगिक स्तरावर 1 सप्टेंबर 2020 पासून याची सुरुवात होणार आहे. सिंधुदुर्गमध्ये कुणकेश्वर आणि तारकर्ली याठिकाणी अशा स्वरुपाची पर्यटन व्यवस्था राहणार आहे.
काय आहे बीच शॅक्स संकल्पना?
बीच शॅक्स म्हणजे चौपाट्यांवरील कुटी होय.
विविध देशांमध्ये प्रसिद्ध असलेले बीच शॅक्स गोव्याचंही आकर्षण आहे
समुद्र किनारी छोट्या शॅक्स किंवा कुट्या उभ्या केल्या जातात
राज्य सरकारच्या निर्णयानुसार एका चौपाटीवर 10 कुट्या उभारल्या जातील
कोकणातील चार जिल्ह्यातील स्थानिकांना त्या कुट्या उभरण्यास प्राधान्य असेल
तीन वर्षांच्या मुदतीसाठी त्याचा परवाना दिला जाईल
त्यासाठी 15 हजार रुपये विना परतावा मूल्य असेल
या कुटीसाठी पहिल्या वर्षी 45 हजार, दुसऱ्या वर्षी 50 हजार, तिसऱ्या वर्षी 55 हजार रुपये वार्षिक शुल्क राहील.
तर परवानाधारकाला 30 हजार रुपये डिपॉझिट भरावी लागेल
या बीच शॅक्स 15 फूट लांब, 15 फूट रुंद आणि 12 फूट उंच असेल
या कुट्यांच्या समोर प्रशस्त बैठक व्यवस्था असेल.
यातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल असा राज्य सरकारचा दावा आहे
कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या किनारी बीच शॅक्स?
रायगडमध्ये : वरसोली (ता. अलिबाग) आणि दिवेआगर (ता. श्रीवर्धन)
रत्नागिरी : गुहागर आणि आरेवारे
सिंधुदुर्ग : कुणकेश्वर, तारकर्ली
पालघर : केळवा आणि बोर्डी बीच
या संदर्भातील अर्ज www.maharashtratourism.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
पर्यटन संचालक दिलीप गावडे अधिक माहिती देणार
कोकणच्या विकासाला चालना देणाऱ्या बीच शॅक धोरणास काल राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या धोरणांतर्गत महाराष्ट्रातील 8 समुद्र किनाऱ्यांना इको फ्रेंडली बीच शॅकसाठी मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे पर्यटकांना समुद्रकिनारी एक मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. स्थानिकांना 80 टक्के रोजगार देणे आवश्यक आहे. याबाबत सविस्तर माहिती पर्यटन संचालक दिलीप गावडे हे 27 जून रोजी फेसबुक संवादातून देणार आहेत.
बीच शॅक्सबाबत नियम
या बीच शॅक्स अर्थात चौपाटी कुटी सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरु राहतील
म्युझिक किंवा संगीता धांबडधिंगा नको
प्रत्येक कुटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असेल
किनाऱ्यांच्या स्वच्छतेची दक्षता घ्यावी…⭕