Home Breaking News आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत तांदुळ, अख्खा हरभऱ्याचे मोफत वितरण – नांदेड, दि. २६...

आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत तांदुळ, अख्खा हरभऱ्याचे मोफत वितरण – नांदेड, दि. २६ ; राजेश एन भांगे

112
0

आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत तांदुळ, अख्खा हरभऱ्याचे मोफत वितरण – नांदेड, दि. २६ ; राजेश एन भांगे

आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत राशनकार्ड नसलेल्यांना तांदुळ व अख्खा हरभऱ्याचे मोफत वितरण सुरु आहे. शिधापत्रिकाधारकांनी स्वस्त धान्य दुकानात गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन धान्य प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. शरद मंडलिक यांनी केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विशिष्ट आपत्कालीन परिस्थिती विचारात घेता, लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यांना मे व जून 2020 मध्ये आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेज योजनेंतर्गत रेशनकार्ड नसलेल्या मजुरांना प्रति व्यक्ती 5 किलो तांदूळ व प्रति कुटुंब 1 किलो अख्खा हरभरा लाभार्थ्यांना वाटप सुरु आहे.

या योजनेंतर्गत जून 2020 मध्ये प्रत्येक कुटुंबाला मे व जून 2020 या दोन महिन्याची (प्रति महिना 1 किलो प्रमाणे) 2 किलो मोफत अख्खा चना व एका व्यक्तीस 10 किलो तांदूळ मोफत (प्रति लाभार्थी प्रती महिना 5 किलो प्रमाणे) मे व जुन या दोन महिन्याचे एकत्रित वाटप सुरु आहे. नांदेड जिल्ह्यात या योजनेत 2 लाख 24 हजार 558 लाभार्थी असून त्यापैकी तांदुळ 78.065 मे. टन व अख्खा चना 3.186 मे. टन. आतापर्यंत वाटप झाला असून शिल्लक लाभार्थ्यांना आपल्या रास्त भाव दुकानात जाऊन अन्न धान्य प्राप्त करुन घ्यावे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत प्राधान्य कुटुंब व अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना नियमीत धान्याबरोबर प्रति सदस्य प्रतिमाह 5 किलो तांदूळ मोफत व मे, जूनची प्रति कुटुंब तुरदाळ किंवा चनादाळ 1 किलो याप्रमाणे दोन महिन्याची दोन किलो दाळ मोफत जूनमध्ये वितरीत करण्यात येत आहे. संबंधित तहसिलदार व सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना सदर धान्य वाटप करण्याबाबत सूचना दिली आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. शरद मंडलिक यांनी नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here