Home Breaking News नाशिकःसख्या भाऊ बनला पक्का वैरीःरक्ताचा वाहिला पाट ( प्रविण अहिरराव प्रतिनिधी  युवा...

नाशिकःसख्या भाऊ बनला पक्का वैरीःरक्ताचा वाहिला पाट ( प्रविण अहिरराव प्रतिनिधी  युवा  मराठा  न्युज  ) नाशिक मधील म्हसरुळ येथे धक्कादायक घटना घडली

127
0

नाशिकःसख्या भाऊ बनला पक्का वैरीःरक्ताचा वाहिला पाट ( प्रविण अहिरराव प्रतिनिधी  युवा  मराठा  न्युज  ) नाशिक मधील म्हसरुळ येथे धक्कादायक घटना घडली आहे. भाऊ सतत भांडण करतो म्हणून सख्या भावाला वैरी बनण्याची वेळी आली आहे. लहाने भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खुन केल्याने घटना स्थळी रक्ताचा पाट वाहिल्याने खळबळ उडाली आहे.

संतोष आणि सुनील दोघे संख्येभाऊ आपल्या कुटूंबासह मखमालाबाद रोडवरील रो-हाऊसमध्ये राहत आहे. संतोष थोरे याला दारूचे व्यसन असल्याने घरातील सदस्यांना कायमच त्रास देत असे. एवढ नाही मोठा भाऊ काहीही कामधंदा करीत नाही. नेहमीच दारू पिऊन घरात वाद घालतो. त्याच्या या वागण्याने काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी घर सोडून निघून गेेली. आज (ता.२३) सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास तो दारू पिऊन त्याचा भाऊ सुनील हा काम करीत असलेल्या शरदचंद्र पवार मार्केट मध्ये गेला. त्याठिकाणी पुन्हा वाद झाल्याने सुनील याने त्याला गाडीवर बसवून घरी घेऊन जात असताना पेठरोड वरील नामको हॉस्पिटल रस्त्यावर मला दारू पिण्यास जायचे असल्याचे सांगत पुन्हा वाद घातला. यावेळी संतापलेल्या सुनील याने गाडी थांबवून रस्त्यावर असलेला दगड उचलून धाकटा भाऊ संतोष याच्या डोक्यावर मारला. त्यात त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील मुख्य संशयीत सुनील थोरे याला घरातून ताब्यात घेतले.

Previous articleपुणे – पिंपरी चिंचवडवर लाँकडाऊनचे सावट ???.. ✍️ पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
Next article*आमदारांच्या हस्ते हुपरीत महा ई* *सेवा केंद्राचे* *उद्घाटन.* *मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा न्यूज*.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here