देगलूर ( संजय कोंकेवार प्रतिनिधी युवा मराठा न्युज ) देगलूर तालुक्यातअमित सीड कंपनीचे (हिरा मोती) सोयाबीन उगवण न झाल्यामुळे या तालुक्यातील विद्यमान आमदार रावसाहेब अंतापूरकर साहेब यांनी कृषी अधिकारी यांना घेऊन शेतावर जाऊन पहानी केली
व पंचनामा केल्यानंतर त्या कंपनी मालकावर योग्य कारवाई करण्यात येईल व शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे आर्थिक मदत देण्यात येईल असे सांगितले अनेक ग्रामीण भागामध्ये अनेक शेतकरी अमित सीड कंपनीचे (हिरा मोती) या कंपनीचे सोयाबीन मोठ्या प्रमाणात शेतकरी खरेदी केली होती व ते पेरणी केल्यानंतर त्याची उगवण झालीच नाही त्यामुळे या तालुक्यातील शेतकरी दुबार पेरणी च्या संकटात सापडलेला असुन पहिलीची पेरणी कसेबसे करून शेतकऱ्यांनी केली होती पण परत दुबार पेरणी म्हणजे शेतकरी हतबल झालाअसुन या अमित सीड कंपनीवर व दुकान चालकावर अशी बोगस बी देऊन शेतकऱ्याला फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी या तालुक्यातील आम शेतकऱ्यांची मागणी आहे व या नुकसान भरपाईचा मोबदला दुबार पेरणी साठी लवकरात लवकर देण्यात यावी अशी आम शेतकऱ्यांची मागणी आहे
