Home Breaking News पत्नीनं औक्षण करून बंदोबस्तासाठी मुंबईला पाठवले! पण परत आले नाही! ✍️...

पत्नीनं औक्षण करून बंदोबस्तासाठी मुंबईला पाठवले! पण परत आले नाही! ✍️ जालना ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

98
0

🛑 पत्नीनं औक्षण करून बंदोबस्तासाठी मुंबईला पाठवले! पण परत आले नाही! 🛑
✍️ जालना ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

जालना :⭕ राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत. कोरोना विषाणूने डॉक्टर, नर्स, पोलीस यांना आपल्या विळख्यात घेतले आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे अनेक कोरोना योद्धे संक्रमित झाले आहेत तर काही कोरोना योध्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोरोन विषाणू विरुद्धच्या लढाईत कोरोनाशी लढा देणाऱ्या एका कोविड योध्याच्या मृत्यूमुळे संपूर्ण राखीव पोलीस बलावर शोककळा पसरली आहे. कोरोनाला झुंज देत असताना पोलीस उप निरीक्षक राजेंद्र गंगा सिंग राणा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

जालना येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक – 3 चे पोलीस उप निरीक्षक राजेंद्र गंगा सिंग राणा यांचं आज मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
राणा हे आंतर सुरक्षा बंदोबस्तासाठी मुंबई येथील संताक्रूझ इंथ फिक्स पॉईंट कोरोना बंदोबस्तासाठी तैनात होते. जालना येथून 15 एप्रिल रोजी राज्य राखीव दलाची एक कंपनी मुंबईला कोरोना बंदोबस्तासाठी रवाना करण्यात आली होती. दरम्यान, यावेळी त्यांच्या पत्नीने त्यांचे औक्षण करून त्यांना निरोप दिला होता.

दरम्यान, 4 जून रोजी सदर कंपनी आपला बंदोबस्त संपवून जालन्यात परतणार होती. मात्र, एक दिवस अगोदरच राणा यांच्यासह 6 जवानांना कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. ज्यामुळे राणा यांच्यासह इतर जवानांना मुंबईच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. बाकीच्या कर्मचाऱ्यांना परत जालन्यात पाठवण्यात आले होते. गेल्या तीन दिवसांपासून राणा यांची प्रकृती जास्तच खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. दरम्यान आज (रविवार) सकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
राणा हे मूळचे उत्तराखंडचे असून त्यांचे वडील राज्य राखीव पोलीस दलातच कार्यरत असल्याचे ते जालन्यातच स्थायिक झाले होते. राणा यांच्या निधनाच्या बातमीनंतर जालना येथील संपूर्ण राज्य राखीव पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. राणा यांच्या पश्चात दोन मुले असून राज्य पोलीस दलाच्या समादेशकांनी विशेष वाहनाने त्यांना मुंबईला रवाना केले आहे.⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here