Home Breaking News कोरोना बरा होण्यासाठी निघाले उपयुक्त औषध ! डॉ. शिवाजी मानकर ...

कोरोना बरा होण्यासाठी निघाले उपयुक्त औषध ! डॉ. शिवाजी मानकर ✍️ चिपळूण ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

120
0
🛑 कोरोना बरा होण्यासाठी निघाले उपयुक्त औषध !
डॉ. शिवाजी मानकर 🛑
✍️ चिपळूण ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

चिपळूण (रत्नागिरी) :⭕ कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागल्यानंतर त्यांच्या लक्षणांचा अभ्यास केला. त्यानंतर कोरोनासाठी होमिओपॅथीचे औषध तयार केले. चिपळूण शहरासह तालुक्यातील धामेली येथील कोरोनाबाधित रुग्णांवर या होमिओपॅथी औषधाने उपचार केले. यातून हे रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. कोरोनावर उपचारासाठी होमिओपॅथी प्रभावी ठरते असा दावा येथील होमिओपॅथी तज्ञ डॉ. शिवाजी मानकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

डॉ. मानकर गेली 36 वर्षे तालुका, जिल्हा तसेच परजिल्ह्यातील रुग्णांना आरोग्य सेवा देत आहेत. चिपळुणात एक डॉक्टर कोरोनाबाधित आढळले होते. डॉ. मानकर म्हणाले, बाधित डॉक्टरांसह धामेली येथील 8 रुग्णांवर आपण यशस्वी उपचार केले आहेत.
शहरातील एक डॉक्टर व त्यांचे आईवडील, तसेच मांगले (ता. शिराळा, जि. सांगली) येथील आणखी एका डॉक्टरर्सना कोरोनाची लक्षणे होती. या चारही लोकांना सर्दी, ताप, घशात खवखव आदी लक्षणे जाणवत होती. धामेली येथील 13 रुग्ण पॉझिटिव्ह होते. या सर्व रुग्णांचा अभ्यास करून त्यांच्यावर होमिओपॅथीने उपचार केले. आता त्यांना घरीही सोडण्यात आले.
शहरातील डॉक्टरांवर कामथे येथे तर धामेलीतील रुणांवर सावर्डे येथील सेंटरमध्ये उपचार केले. या रुग्णांनी आपल्याकडे संपर्क साधून उपचार करण्याची विनंती केली होती. या रुग्णांना औषधांचे 5 डोस दिल्यानंतर त्यांच्यातील लक्षणे नाहीशी झाली.जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर आपण जिल्हा शल्यचिकित्सकांशी संपर्क साधून समन्वयाने काम करण्याची तयारी ठेवली होता. मात्र त्यात काही अडचणी आल्याने ते शक्य झाले नसल्याचे डॉ. मानकर यांनी सांगितले.
27 मे रोजी कोरोना निष्पन्न झाल्यानंतर 28 ला कामथे उपजिल्हा रुग्णालयात डॉ. स्वप्निल तलाठी उपचारासाठी दाखल झाले.डॉ. मानकर यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयातील नर्सवर यशस्वी उपचार केल्याची माहिती परशुराम रुग्णालयातील सहकारी डॉक्टरकडून त्याना मिळाली. डॉ. मानकरांकडून उपचार सुरू केले. आयुष मंत्रालयाने मान्यता दिलेला आयुष काढाही घेत होतो. दर दोन तासांनी ते फॉलोअप घेत होते. ताप, खोकला, घशात खवखव,डोकेदुखी, चव न समजणे, वास न समजणे आदी लक्षणे होती. उपचार सुरू झाल्यानंतर दोन दिवसात बरे वाटले. तिसर्‍या दिवशी लक्षणे नाहीशी झाली.
आई-वडिलांनाही सावर्डे येथे उपचार सुरू होते. उलट त्यांना इतर आजार जास्त होते. त्यांच्यावरही डॉ. मानकरांनी उपचार करून बरे केले…⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here