Home Breaking News सोलापूरच्या महापौर यन्नम यांची कोरोनावर मात

सोलापूरच्या महापौर यन्नम यांची कोरोनावर मात

201

🛑 सोलापूरच्या महापौर यन्नम यांची कोरोनावर मात 🛑
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

सोलापूर :⭕ सोलापूरच्या महापौर श्रीकांचना यन्नम आणि पती रमेश यन्नम यांना कोरोनाची लागण झाली होती. १० दिवसांच्या उपचारानंतर कोरोनातून मुक्त होऊन महापौर आणि त्यांचे पती असे दोघेसुद्धा शुक्रवारी घरी परतले. हॉस्पिटल प्रशासन आणि भाजप पदाधिकार्‍यांनी हॉस्पिटलबाहेर फुले उधळून त्यांचे स्वागत केले. कोरोनाला घाबरून न जाता त्यावर मात करण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे. तसेच कोरोनापासून दूर राहण्यासाठी सर्वांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन महापौरांनी यावेळी बोलताना केले.

दरम्यान महापौर व त्यांच्या पतीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य यंत्रणा कामाला लागली होती. महापौरांचे निवास आणि त्यांचे खाजगी निवास परिसर सॅनिटाइझ करण्यात आला होता. सोलापुरात गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून कोरोनाने थैमान घातले आहे. या महामारीदरम्यान महापौर आणि महापालिका आयुक्त शहरातील विविध भागांमध्ये पाहणी करण्याच्या उद्देशाने फिरले. त्यांच्यासोबत काहीठिकाणी महापौरांचे पतीदेखील होते. अंगदुखीचा त्रास होऊ लागल्याने त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. मात्र 3 जून रोजी सकाळी अहवाल आल्यानंतर कोरोनाने महापौर बंगल्यातसुद्धा शिरकाव केल्याचे दिसून आले होते. त्यानंतर महापौर व त्यांच्या पतीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. यादरम्यान पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनीसुद्धा त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली होती. ग्रामीण भागात सात रुग्ण सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या अक्कलकोट, मोहोळ आणि अकलूजमध्ये शुक्रवारी एकाच दिवसात कोरोनाचे सात रुग्ण आढळून आले. माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील सुमित्रा नगर, अक्कलकोटमध्ये एक पुरुष तसेच मोहोळ तालुक्यातील सोहाळे येथे एका पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात आले. याशिवाय मुळेगाव, वळसंग या गावामध्येसुद्धा कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आतापर्यंत १०३ जण बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झालं आहे…⭕

Previous articleमुंबईत आढळली कोरोनाची नवी लक्षणे, हा त्रास झाला तर त्वरीत जा डॉक्टरांकडे
Next articleजनावरांचा बाजार भरविल्यास* *कोरोना व्हायरसला आमंत्रणच.*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.