🔴 *ब्रेकिंग न्यूज कोल्हापूर* 🔴
कोल्हापूर : (मोहन शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)-संपूर्ण जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत नऊ हजारांहून अधिक लोकांचा जीव गेला आहे; त्यामुळे अमेरिका, चीनकडून कोरोनावर लस शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. अमेरिकेच्या सीएटल फ्लू स्टडी सेंटरमध्ये संशोधकांचं एक पथक दिवसरात्र कोरोनावर प्रतिबंधात्मक लस शोधण्याचा प्रयत्न करत आहे आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे त्याचे नेतृत्व एका मराठी माणसाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथील जय शेंडुरे या युवकाकडे आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध देश प्रयत्न करत आहेत. जय शेंडुरे यांनी बाळाच्या जन्मापूर्वीच त्याला असणाऱ्या संभाव्य आजाराची माहिती शोधण्याचे संशोधन केले होते. गर्भाची डीएनए ब्ल्यू प्रिंट म्हणून २0१२ मध्ये ती विकसित करण्यात आली होती.
जगभरात कोरोनाचा फैलाव झाला आहे. नऊ हजारांपेक्षा अधिक जणांचा जीव गेला आहे. लोकांचा जीव वाचविण्यासाठी वेगवान हालचाली करण्याची गरज आहे. कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी लवकरात लवकर यश मिळेल.