• Home
  • *वृतपत्र स्वातंत्र्य आणि बोगस पत्रकारांचा सुळसुळाट*

*वृतपत्र स्वातंत्र्य आणि बोगस पत्रकारांचा सुळसुळाट*

*वृतपत्र स्वातंत्र्य आणि बोगस पत्रकारांचा सुळसुळाट* *लोकशाहीचे सर्वात मोठे स्वातंत्र्य हे वृतपत्र स्वातंत्र्य आहे. वृतपत्रांच्या माध्यमातून आपण भल्या भल्यांना वठणीवर आणून त्यांची चुक दाखवून देऊ शकतो.वृतपत्र आणि पत्रकार म्हणजे एक आरसा आहे.समाजात ज्या चांगल्या वाईट घटना घडतात त्याला सर्वप्रथम पत्रकारांच्या नजरेतून प्रतिबिंबीत केले जाते.आणि आजही या जगातील अशी अगणित जनता आहे की,ती वृतपत्रांवरच विश्वास ठेऊन आपले कार्य करीत असते.वृतपत्र आणि पत्रकाराने जर ठरवलेच तर मोठमोठे कार्य विनासायास लिलया पार पाडता येऊ शकतात.याचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे पत्रकार काय करु शकतो.हे उदाहरणादाखल सांगायचे झाले तर..नाशिक जिल्ह्यातील मालेगांव जवळील गिगाव या गावाकडे जाणारा रस्ता हा गेल्या चाळीस वर्षापासून रखडलेला होता.रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले होते.पायी चालणेही मुश्कीलीचे झालेले होते.या रस्त्यावर बरेचदा अपघातही झालेले होते.मात्र या गंभीर प्रश्नाकडे सगळ्यांचेच जाणून बुजून दुर्लक्ष होते.वास्तविक हे गाव माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या मतदार संघात येत असल्याने आम्हीही सहज म्हणून तेथील त्या रस्त्याच्या बातमीला जास्तच महत्त्व देऊन प्रक्षेपित केली.तर त्याचा परिणाम असा झाला की,अवघ्या आठच दिवसात त्या गिगांवकडे जाणारा रस्ता अगदी नव्याने बनवून चकचकीत करण्यात आला.त्यावेळी आम्हांला गिगाव गावात बोलावून आमचा सत्कार करुन सन्मान करण्यात आला त्या गावचे माजी सरपंच भगवान जाधव यांनी आमचे आभार मानले.पत्रकारांच्या नशिबी असे सुखाचे प्रसंग क्वचितच येतात.बहुतेकदा पत्रकारांच्या नशिबात दुःखच जास्त असते.जो आपल्या लेखनीव्दारे भल्याभल्यांना घाम फोडतो,त्याच्या समस्या मात्र कुणीच जाणून घेत नाही ही दुदैवाची आहे.त्याला कारणही तसेच आहे.पत्रकारितेत बोगस व भामटी हडवाळ शिरल्याने पत्रकारितेचे पावित्र्य तरी कसे जोपासले जाणार?हा देखील प्रश्नच आहे.कुणीही उठायचे पत्रकार म्हणून मिरवायचे याला नेमके काय समजायचे? पत्रकारितेचे काही नियम आचारसंहीता आहेत तेच नेमके या भामटया पत्रकारितेत शिरलेल्या हडवाळीला माहित नाही.त्यामुळेच अवैध धंद्यावाल्यापासून ते अगदी सडकछाप फुटपाथवर बसलेल्यांपर्यत सगळ्यांनाच पत्रकारितेचा दर्जा दिल्यावर कसे टिकणार खरे पत्रकारितेचे पावित्र्य याचे भान मात्र आजच्या पोटभरु पत्रकारांनी ठेवलेले नाही.सर्वात वाईट व मोठी शोकांतिका हि आहे की,यु-टुयुबसारख्या माध्यमातून बोगस पत्रकार तयार होण्याचे प्रमाण खुपच वाढले आहे.वास्तविक त्यावर आता अंकूश घालण्याचे काम पोलिस प्रशासनानेच करायला पाहिजे.नाही तर भविष्यात त्याचा वाईटच परिणाम होईल.खरे तर पत्रकार कुणाला म्हटले जाते याचे संशोधन व आत्मपरिक्षण होणे गरजेचे आहे.जो कुठल्या तरी अधिकृत वृतपत्रात काम करतो किंवा एखाद्या वृतपत्रांच्या आधारावर यु-टुयूबवर चँनल्स चालवतो तो अधिकृत पत्रकार!मात्र आजकाल यु-टुयूबवरील बोगस चँनल्स व भामटया पत्रकारांचा वाढलेला सुळसुळाट बघितला तरी हे सगळ समजत असूनही जनता काय म्हणून सहन करते?हेच नेमके कळत नाही.वास्तविक हे बोगस पत्रकार मग आधिकारी वर्गाला ब्लँकमेलिंग करणे,एखाद्या सावसारखे नामांकित पत्रकार असल्यासारखे ऐटीत मिरविणे हे सर्वच घातक आहे.त्याचे दुष्परिणाम शासनासह सगळ्यांनाच भोगावे लागतील हि वस्तुस्थिती कुणीही नाकारु शकत नाही.त्यावर मोलाचा उपाय एकच ठरु शकतो.पोलिस प्रशासनाने एकदा पत्रकारांची पडताळणी केलीच पाहिजे म्हणजे बोगस पत्रकारिता करुन धुमाकूळ घालणारी भामटी हडवाळही यानिमिताने उघड होईल.* *राजेंद्र पाटील राऊत⏺मुख्य संपादक -युवा मराठा न्युजपेपर्स अँन्ड न्युज चँनल⏺पोलिसमित्र-महाराष्ट्र पोलिस⏺उतर महाराष्ट्र अध्यक्ष -राष्ट्रीय मराठा पार्टी ⏺महाराष्ट्र प्रदेश उपअध्यक्ष एडिटर्स अँन्ड जर्नालिस्ट वेल्फेयर असोशियन मुंबई ⏺राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्कार सन्मानीत २०१९*

anews Banner

Leave A Comment