• Home
  • दहिवडला बिबट्याच्या हल्ल्यात दोन गोऱ्हे ठार 👉🏼सविस्तर बातमीपत्र

दहिवडला बिबट्याच्या हल्ल्यात दोन गोऱ्हे ठार 👉🏼सविस्तर बातमीपत्र

दहिवडला बिबट्याच्या हल्ल्यात दोन गोऱ्हे ठार 👉🏼सविस्तर बातमीपत्र
(भिला आहेर तालुकाप्रतिनिधी युवा मराठा न्युज)-
देवळा:- दहिवड येथील यलदर शिवारात राहणाऱ्या परशराम तुकाराम मोरे यांच्या ग.नं ८१६ मधील शेतातील घराजवळील झाडाला दोरखंडाने बांधलेल्या दोन गोऱ्ह्यावर शनिवारी (ता. १३) पहाटे तीनच्या सुमारास दोन बिबट्यांनी हल्ला केल्यानंतर मोठमोठ्याने गुरं हंबरू लागली त्या आवाजाने परशराम मोरे व त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर मोरे यांनी बॅटरी घेऊन शोध घेतला असता बॅटरीच्या प्रकाशात दोन बिबट दोन्ही गोऱ्ह्यावर पाठीमागून पकडून हल्ला करीत होते.
मोरे यांनी घरातून आरडाओरड तसेच थाळीचा आवाज करीत हुसकावण्याचा प्रयत्न केला परंतु दोन्ही बिबट्यांनी १५ ते २० मिनिट ठाण मांडत दोन्ही गोऱ्हे फस्त केले.
मोरे यांच्या ओरडण्याच्या आवाजाने आजूबाजूचे शेतकरी जमा झाले त्या जमावाच्या आवाजाने दोनही बिबट्यांनी उत्तर दिशेला असलेल्या डोंगराकडे धूम ठोकली. बिबट्याच्या हल्ल्यामुळे दोनही गोऱ्ह्याचा मृत्यू झाला असून शेतकऱ्याचे तीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.या घटनेची माहिती वन विभागाला दिल्यानंतर उमराणे वनपाल ए.टी. मोरे,वनरक्षक माणिक साळुंखे आदींनी घडनास्थळी भेट देत पंचनामा केला. सद्या पेरणीचे व शेती मशागतीचे कामे चालु असतानाच बैलांवर बिबंट्याने हल्ला केल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे तरी
वन विभागाने पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी दहिवडचे सरपंच आदिनाथ ठाकुर उपसरपंच मनिष ब़ाम्हणकार व परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

anews Banner

Leave A Comment