🛑 युवकाची ‘अजिंक्यतारा’ वरुन उडी ? 🛑
✍️( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
सातारा :⭕शहरातील एका युवकाने दरीत उडी टाकून आत्महत्या करत असल्याचा मेसेज त्याच्या घरी केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर युवकाचा अजिंक्यतारा किल्ल्यासह ठिकठिकाणी शोध घेतला जात आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, संबंधित युवक २२ वर्षांचा आहे. तो पुण्याला असतो. मात्रं लॉकडाऊन झाल्यानंतर तो काही दिवसांपूर्वी साताऱ्यात आला होता. सोमवारी सकाळी तो उठून बाहेर फिरायला गेला. याचवेळी त्याच्या मोबाईलवरून घरी मेसेज आला की, मी आत्महत्या करत असून डोंगरावरून उडी मारत आहे. हा मेसेज कुटुंबीयांनी पाहिल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी फोन लावला मात्र प्रतिसाद मिळाला नाही.
तत्काळ त्या मेसेजच्या आधारे युवकाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आला आहे.⭕