🛑 २६०० बेस्ट बस आज रस्त्यांवर; विरार, बदलापूरमधूनही सेवा 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
मुंबई, 8 जून : ⭕ मुंबईकरांना आज, सोमवारपासून बेस्टकडून प्रवासी सेवा पुरविली जाणार असून, पहिल्या दिवसापासूनच सुमारे २,६०० बस चालविण्याचे नियोजन आहे. मात्र, रेल्वे सेवा बंद असल्याने बेस्ट सेवेवर ताण पडून मुंबईकर प्रवाशांना गैरसोय होण्याची भीती आहे. प्रवाशांची अडचण लक्षात घेऊन बेस्टने पनवेल, कल्याण, विरार, नालासोपारा, बदलापूरमधूनही मुंबईत येण्यासाठी बसमार्ग खुले केले आहेत.
यापूर्वीच बेस्टकडून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुमारे १,५०० बस चालविल्या जात आहेत. त्यात सोमवारपासून ८१ मार्गांवर सुमारे ९५० बस चालविल्या जातील. त्यामुळे बेस्टच्या ताफ्यातील ३,५०० बसपैकी २,६०० बस सोमवारपासून सेवेत येतील. मात्र, त्यात प्रवाशांसाठी असलेल्या बसची संख्या कमी असू शकेल.
बसमार्ग…
➡️ गोराई आगारमार्गे विरार
➡️ बोरिवली रेल्वे स्टेशन ते मालवणी आगार २० बस
➡️ नालासोपारा व्हाया एसव्ही रोड ते कोरा केंद्र – पश्चिम द्रूतगती मार्ग ते गोरेगाव आगार (१५ बस)
➡️ बदलापूर व्हाया ऐरोली-शिळफाटा ते राणी लक्ष्मी चौक (१५ बस)
➡️ कल्याण व्हाया मुंब्रा-खारेगाव ते राणी लक्ष्मी चौक (१५ बस)
➡️ पनवेल ते राणी लक्ष्मी चौक (१० बस)
➡️ सायंकाळच्या वेळेस परतीच्या मार्गावर ५.१५ वाजल्यापासून बस धावतील.
➡️ सायंकाळी कामावर जाणाऱ्यांना दुपारी ३.४५ मिनिटांनी बस सुटतील.⭕