*🛑मुंबई : प्रवासादरम्यान पोलीस कर्मचाऱ्याचा वाढदिवस आहे समजल्याने गृहमंत्र्यांनी भावनिक होऊन दिल्या शुभेच्छा.!* 🛑
✍️( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
मुंबई, 08 जून :⭕ महाराष्ट्रापुढे कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. कोरोनाशी दोन हात करत राज्याचे पोलीस कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावून कर्तव्य बजावत आहे. पोलिसांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आवर्जून पोलिसांच्या भेटी घेत आहे. आज अशीच एक भेट मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर झाली आणि अवघ्या पोलीस दलासाठी ती खास ठरली.
गृहमंत्री अनिल देशमुख हे पुण्यावरून मुंबईच्या दिशेनं प्रवास करत होते. नेहमी प्रमाणे पोलिसांचा बंदोबस्त दिसून आल्यामुळे गृहमंत्र्यांनी आपला ताफा थांबवला आणि पोलिसांशी संवाद साधला. किवळे फाट्यावर अनिल देशमुख कर्तृव्यावर असलेल्या पोलिसांशी चर्चा करत होते.
आज पुण्यावरुन मुंबईला जाताना एक्सप्रेस हायवेवर किवळे फाटा येथे कर्तव्यावर असलेले पोलिस अधिकारी / कर्मचारी यांचेशी संवाद साधतांना समजले की उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला व त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
त्यावेळी कर्तव्यावर असलेले पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांचा आज वाढदिवस असल्याचं लक्षात आले. त्यामुळे अनिल देशमुख यांनी तातडीने केक आण्यास सांगितले. पोलिसांच्या गाडीवरच केक कापून श्रीकांत जाधव यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. खुद्द अनिल देशमुख यांनी श्रीकांत जाधव यांना केक भरवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
राज्याच्या गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत आपला वाढदिवस साजरा झाला आणि खुद्द गृहमंत्र्यांनीच केक भरवला, यामुळे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांच्यासह सर्वच अधिकारी आणि कर्मचारी भारावून गेले होते.⭕