Home Breaking News प्रवासादरम्यान पोलीस कर्मचाऱ्याचा वाढदिवस आहे समजल्याने गृहमंत्र्यांनी भावनिक होऊन दिल्या शुभेच्छा.!*

प्रवासादरम्यान पोलीस कर्मचाऱ्याचा वाढदिवस आहे समजल्याने गृहमंत्र्यांनी भावनिक होऊन दिल्या शुभेच्छा.!*

122
0

*🛑मुंबई : प्रवासादरम्यान पोलीस कर्मचाऱ्याचा वाढदिवस आहे समजल्याने गृहमंत्र्यांनी भावनिक होऊन दिल्या शुभेच्छा.!* 🛑
✍️( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
मुंबई, 08 जून :⭕ महाराष्ट्रापुढे कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. कोरोनाशी दोन हात करत राज्याचे पोलीस कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावून कर्तव्य बजावत आहे.  पोलिसांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आवर्जून पोलिसांच्या भेटी घेत आहे. आज अशीच एक भेट मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर झाली आणि अवघ्या पोलीस दलासाठी ती खास ठरली.

गृहमंत्री अनिल देशमुख हे पुण्यावरून मुंबईच्या दिशेनं प्रवास करत होते. नेहमी प्रमाणे पोलिसांचा बंदोबस्त दिसून आल्यामुळे गृहमंत्र्यांनी आपला ताफा थांबवला आणि पोलिसांशी संवाद साधला.  किवळे फाट्यावर अनिल देशमुख कर्तृव्यावर असलेल्या पोलिसांशी चर्चा करत होते.

आज पुण्यावरुन मुंबईला जाताना एक्सप्रेस हायवेवर किवळे फाटा येथे कर्तव्यावर असलेले पोलिस अधिकारी / कर्मचारी यांचेशी संवाद साधतांना समजले की उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला व त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

त्यावेळी कर्तव्यावर असलेले पोलीस  उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांचा आज वाढदिवस असल्याचं लक्षात आले. त्यामुळे अनिल देशमुख यांनी तातडीने केक आण्यास सांगितले. पोलिसांच्या गाडीवरच केक कापून श्रीकांत जाधव यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. खुद्द अनिल देशमुख यांनी श्रीकांत जाधव यांना केक भरवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

राज्याच्या गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत आपला वाढदिवस साजरा झाला आणि खुद्द गृहमंत्र्यांनीच केक भरवला, यामुळे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव  यांच्यासह सर्वच अधिकारी आणि कर्मचारी भारावून गेले होते.⭕

Previous article२४ तासात एकही पोलिस कोरोना पॉझिटीव्ह नाही
Next articleनाशिक जिल्ह्यात भीषण अपघात तीन जण ठार, 2 महिला गंभीर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here