🛑 काँल करणाऱ्या शेतकर्याला ! अजित पवारांचे उत्तर ! 🛑
अहमदनगर 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
अहमदनगर :⭕ राज्यभरात मान्सुनच्या आगमनापूर्वी उन्हाचा पारा चांगलाच चढला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल आहेत. याच पार्श्वभूमीवर अहमदनगरमधील एका शेतकऱ्याने पाण्याच्या प्रश्नावर थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच कॉल केला या शेतकऱ्याने अजित पवार यांच्याकडे ऊस जळून जात असल्याची व्यथा सांगत कुकडी प्रकल्पात पाणी सोडण्याची मागणी केली. यावर अजित पवार यांनी आपण कुठल्याही वरिष्ठ मंत्र्याच्या कामात लुडबुड करत नसल्याचं स्पष्ट करत जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांच्याशी बोलायला सांगितले.
या शेतकऱ्याचा आणि अजित पवार यांच्या संभाषणाची क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
क्लिपमधील शेतकऱ्याचं नाव मारुती भापकर असं आहे. ते अजित पवार यांना म्हणाले, ‘मी श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा या गावातील रहिवासी आहे. राहुल जगताप यांच्या गावाशेजारीच माझं गाव आहे. कुकडीचं आवर्तन आणखी 15 दिवसांनी सोडणार म्हणत आहेत. मात्र, ऊस आणि इतर बाकीची पिकं जळून चालली आहेत. ‘
यावर अजित पवार म्हणाले, ‘हे खातं माझ्याकडं नाही, जयंत पाटील यांच्याकडं आहे. त्यांनी याची बैठक घेतली होती. ज्यावेळी माझे सहकारी, माझे प्रांताध्यक्ष बैठक घेतात त्यावेळी मी त्यात जास्त लुडबुड करत नाही. जयंत पाटील यांना बोलावं लागेल. राहुल जगताप यांना जयंत पाटील यांच्याशी बोलण्यास सांगा.’
यानंतर संबंधित शेतकऱ्याने अजित पवार यांना तुम्ही हस्तक्षेप करा असं म्हटलं. त्यावर अजित पवार यांनी स्पष्टपणे नकार देत सांगितलं, ‘जयंत पाटील यांनी 15 दिवसांपूर्वीच कुकडी प्रकल्पाची बैठक घेतली आहे. त्यात त्यांनी याविषयी काही निर्णय घेतले आहेत. जयंत पाटील हे पदाने माझे वरिष्ठ आहेत. हे खातं जर जयंत पाटील यांच्याकडे नसतं, इतर कुणाकडे असतं तर मी सांगितलं असतं.’
