• Home
  • रिक्षाचालकाच्या डोक्यावर पडलं फणस, उपचारांसाठी दवाखान्यात गेल्यावर समोर आलं भलतंच

रिक्षाचालकाच्या डोक्यावर पडलं फणस, उपचारांसाठी दवाखान्यात गेल्यावर समोर आलं भलतंच

  • ⭕रिक्षाचालकाच्या डोक्यावर पडलं फणस, उपचारांसाठी दवाखान्यात गेल्यावर समोर आलं भलतंच⭕
    केरळ 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

कारसगोड -: देशात कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. शहरापासून ते गावापर्यंत आता कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. अनेक रुग्ण असे देखील आहेत ज्यांना कोरोना होऊन देखील कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसत नाहीत. अशी व्यक्ती ओळखणे अवघड बनत असल्याचे आता समोर येत आहे.
केरळच्या कारसगोडमध्ये एक विचित्र घटना समोर आली असून या घटनेमुळे प्रशासन देखील चक्रावले आहे. कारसगोडमध्ये येथून एक अपघाताची घटना समोर आली आहे. ती व्यक्ती व्यवसायाने ऑटो रिक्षाचालक आहे.फणस काढताना तो डोक्यात पडल्याने हा व्यक्ती जखमी झाला होता. दुखापत गंभीर असल्याने या व्यक्तीला शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र उपचारादरम्यान, चाचणी केली असता तो कोरोनाग्रस्त असल्याचे समोर आले. त्याचा कोणताही प्रवासी इतिहास नसल्याचे तपासात समोर आले आहे. आता या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात असून प्रशासनाची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.
दरम्यान, देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होता आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 38 हजार 845 झाला आहे. यासोबतच कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारत दहाव्या स्थानावर पोहोचला आहे. देशात गेल्या 24 तासात 6 हजार 977 कोरोनाबाधित वाढले. आतापर्यंतची ही सर्वाधिक वाढ आहे. तर मागील 24 तासात 154 मृत्यूमुखी पडले. केरळमध्ये 847 रुग्ण असून त्यातील 521 बरे झाले आहे. तर चौघांचा मृत्यू झाला आहे. केरळचा रिकव्हरी रेट 61.51 टक्के आहे. गेल्या दहा-बारा दिवसात केरळमध्ये रुग्णांची संख्या हळूहळू वाढतेय त्यामुळे रिकव्हरी रेट 94 टक्क्यांवरुन 61 टक्क्यांवर आला आहे…

anews Banner

Leave A Comment