Home Breaking News सैराट फेम अभिनेता आकाश ठोसरला भुलली महिला! अखेर तो “परशा ”...

सैराट फेम अभिनेता आकाश ठोसरला भुलली महिला! अखेर तो “परशा ” अटक

138
0

⭕सैराट फेम अभिनेता आकाश ठोसरला भुलली महिला!
अखेर तो “परशा ” अटक⭕
अहमदनगर 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

अहमदनगर | सैराट फेम अभिनेता आकाश ठोसर याच्या नावाने फेसबुकला बनावट खाते उघडून अहमदनगर शहरातील महिलेची फसवणूक करणार्‍या पुण्याच्या एकाला अहमदनगर सायबर सेल पोलिसांनी आज अटक केली आहे. शिवदर्शन नेताजी चव्हाण ऊर्फ शिवतेज (रा. पिंपरी चिंचवडी, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. महिलेकडून घेतलेले मंगळसूत्र आणि सोन्याची अंगठी पोलिसांनी जप्त केली आहे. एक लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी या बनावट परशाकडून जप्त केला आहे.

एमआयडीसी येथे या महिलेचा चार महिन्यापूर्वी फेसबुकवर सैराट फेम अभिनेता आकाश ठोसर याच्या बनावट खात्याशी संपर्क आला. पिंपरी-चिंचवड येथील शिवदर्शन हे खाते हाताळत होता.
याच खात्यावरून त्याने अहमदनगरमधील महिलेशी मैत्री वाढवली. आर्थिक अडचण असल्याचा बहाणा करत त्याने महिलेकडून मंगळसूत्र आणि एक अंगठी नगरला येऊन घेतली. सदर फेसबुक अकाऊंट बंद झाल्यानंतर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. अखेर नगरच्या सायबर सेलने प्रकरणाचा छडा लावत पिंपरी-चिंचवड मधून तोतया परशा अर्थात आरोपी शिवदर्शनला अटक केली आहे..

Previous articleपोलिसाशी पत्नीचे अनैतिक संबंध तरुणाने पोलिस चौकीतच घेतले पेटवून
Next articleरिक्षाचालकाच्या डोक्यावर पडलं फणस, उपचारांसाठी दवाखान्यात गेल्यावर समोर आलं भलतंच
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here