• Home
  • डॉक्टर आपल्या दारी !अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

डॉक्टर आपल्या दारी !अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

⭕ डॉक्टर आपल्या दारी !अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद! ⭕
पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कैंटोनमेंट मतदारसंघ पुणे व डॉक्टर सेल व पुणे मनपा डॉक्टर आपल्या दारी या अभियाना अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिर काल आमदार व शहराध्यक्ष चेतन दादा तुपे पाटिल यांच्या मार्गदर्शना खाली व #नगरसेविका हेमलता मगर यांच्या प्रयत्नाने, #हेमलता मगर जनसंपर्क कार्यालय, आकाशवाणी येथे आयोजित करण्यात आले.
या शिबीरामध्ये नागरीकांचे शारिरीक तापमान, ऑक्सिजन पातळी व जनरल आरोग्य तपासणी केली गेली .तसेच सहभागी नागरिकांना मोफत औषधे उपलब्ध करून देण्यात आली. सहभागी डॉक्टरानी पीपीइ किट घालून सहभाग घेणाऱ्या नागरिकांची तपासणी केली. तसेच नागरिकांनी कुठलीही भीती न बाळगता स्वतः ला, कुटुंबाला, व समाजाला आरोग्यपूर्ण ठेवण्यासाठी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे अपील केले गेले. याचा सकारात्मक परिणाम होऊन सुमारे ५९८ नागरिकांनी याचा लाभ घेतला. या कार्यक्रमासाठी सदा कार्यरत असणारे
डॉ.सुहास लोंढे, (अध्यक्ष डॉक्टर सेल, हडपसर विधानसभा), डॉ अशोक बनसोडे, दिपक भोसले व वेळोवेळी सर्वांना सहकार्य करणारे डॉ.शंतनु जगदाळे. ही डॉक्टरांची टीम कार्यरत होती व‌ त्या बद्दल सर्वांचे आभार मानले.
तसेच या प्रसंगी प्रभागा तील सहकारी नगरसेवक .बंडु तात्या गायकवाड, नगरसेविका #पुजा ताई कोद्रे, स्वीकृत नगरसेविका सौ संजिवनी जाधव, आशाताई बोडके, गिरमकर मामा, मारणे साहेब, परिसरातील जेष्ठ मंडळी, पदाधिकारी व कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते. शिबीराचे #आयोजन#
श्री.निलेश दादा मगर, मा.उपमहापौर.
सौ.हेमलता निलेश मगर , नगरसेविका, सदस्य – शहर सुधारणा समिती.
यांनी केले.

anews Banner

Leave A Comment