- *दहिवडला डाँ.सचिन मोरेंचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार*
दहिवड,(युवराज देवरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-
आज गुरुवार दि. २१/०५/२०२० रोजी सकाळी ९ वा.दहिवड ता देवळा जि नाशिक येथे ग्रामस्थांचे वतीने गांवाचे भुमिपुत्र डॉ.सचिन (उमेश) शंकर मोरे वायगांव दुंधे येथिल कार्यरत वैद्यकीय अधिकारी यांनी मन्सुरा हाॅस्पिटल येथे कोरोना व्हायरस बाधितांवर उपचार करून ब-याच नागरिकांना जीवन दान दिले.त्याबद्दल त्यांचा सत्कार यशवंत भुमी दहिवड येथे सरपंच आदिनाथ ठाकुर, उपसरपंच मनेष ब्राम्हणकार, तंटामुक्त समिती अध्यक्ष गणेश देवरे, प्रहार तालुकाध्यक्ष संजय दहिवडकर, युवा मराठा न्युज चे निवासी संपादक राहुल मोरे ,प्रतिनिधी युवराज देवरे व ग्रामस्थांचे वतीने शासकीय कलम १४४ नियमाला अधिन राहून हार्दिक अभिनंदन सत्कार यथोचित पार पाडला.
शासकीय नियमांस अनुसरून नागरिकांनी नियमांचे पालन केले त्याबद्दल गावकऱ्यांचेही हार्दिक अभिनंदन.